शिर्डी : महाराष्ट्राचे अराध्य दैवत असलेल्या विठुरायांच्या दर्शनासाठी भाविकांची मादियाळी पंढरपुरात दिसून आली. तसेच साईबाबांना विठ्ठल स्वरुप मानणाऱ्या भाविकांनी शिर्डीत दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी साईबाबा संस्थाननेही एकादशीचे महत्व लक्षात घेता शिर्डीत येणाऱ्या भाविकांसाठी 12 हजार किलोच्या खिचडीचा प्रसाद बनवला होता. आज दिवसभरात 60 हजार भाविकांनी खिचडी प्रसादाचा लाभ घेतला असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
आषाढीला शिर्डीत वारकऱ्यांची गर्दी : साईबाबांच्या हयातीत साईबाबांचे परम भक्त दासगणू महाराज दरवर्षी आषाढीच्या वेळी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात होते. दासगुणांची एक आषाढी वारी चुकली आणि विठ्ठल दर्शनासाठी आतुर झालेल्या दासगणुनांना साईबाबांनी विठ्ठलाच्या रुपात दर्शन दिले. तेव्हा दासगुण महाराजांनी विठ्ठलाकडे बघून शिर्डी माझे पंढरपूर नावाची काव्यरचना लिहिली. आजही साईमंदिरात साईबाबांच्या मंगल स्नानानंतर हीच आरती म्हटली जाते. असंख्य भक्त बाबांना विठ्ठल रूप मानतात. दर आषाढीला साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला वारकरी मोठ्या संख्येने येतात. इथेच त्यांना त्यांचा पांडूरंग विठ्ठलाच्या रुपाने मिळतो.
साईबाबांना तुळशीचा हार : आषाढी एकादशीचे महत्त्व लक्षात घेऊन साईबाबा संस्थानच्या वतीने समाधीवर विठ्ठलाची मूर्ती बसविण्यात आली. साईबाबांच्या मूर्तीला तुळशीच्या माळा, सोन्याच्या दागिन्यांनी सजवण्यात आले आहे. साईबाबांना वर्षभर फुलांचा हार घातला जातो.मात्र, फक्त आषाढी एकादशीलाच बाबांना तुळशीचा हार घातला जातो. उपवासाचा दिवस लक्षात घेऊन शिर्डीत येणाऱ्या भाविकांसाठी साई संस्थानच्या प्रसादालयात आज शाबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले.
12 हजार किलोची साबुदाणा खिचडी : यंदा 60 हजार भाविकांसाठी 12 हजार किलोची साबुदाणा खिचडी तयार करण्याचे नियोजन संस्थानाने केले. 6 हजार किलो साबुदाणा, 3 हजार किलो शेंगदाणे, 2 हजार किलो बटाटे, 700 किलो वनस्पती तूप, 60 किलो भगर, 300 किलो मिरचीचा वापर करून ही प्रसाद खिचडी तयार करण्यात आली. दिवसभर शाबुदान्याची खिचडी आणि शेगदाण्याची आमटी हेच जेवण म्हणुन देण्यात येते. आज आषाढी एकादशीच्या निम्मीताने रात्री भगवान विठ्ठल रुखमिणीची प्रतीमा ठेवून साईंच्या रथाची मिरवणूक काढण्यात येते.