ETV Bharat / state

​​​​​​​बारावीच्या विद्यार्थ्याची अकोल्यात गळफास घेऊन आत्महत्या

जिल्ह्यातील अकोले येथे सौरभ तात्यासाहेब मंडलिक (वय १८) या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तो मॉडर्न हायस्कूल येथे विज्ञान शाखेत बारावीचा विद्यार्थी होता.

author img

By

Published : Mar 2, 2019, 8:08 AM IST

सौरभ मंडलिक

अहमदनगर - जिल्ह्यातील अकोले येथे सौरभ तात्यासाहेब मंडलिक (वय १८) या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तो मॉडर्न हायस्कूल येथे विज्ञान शाखेत बारावीचा विद्यार्थी होता. त्याची परीक्षा सुरू होती. ही घटना शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली.

मॉडर्न हायस्कूल

अकोले शहरातील सारडा पेट्रोल पंपामागे डॉ. मंडलिक हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावर सौरभने गळफास घेऊन जीवन संपविले. सौरभने आत्महत्या केली त्या खोलीत वह्या पुस्तके अस्तव्यस्त पडलेली होती. तसेच त्याची परीक्षा सुरु होती. मृत सौरभचे वडील शिक्षक असून चुलते डॉक्टर आहेत. तो अकोल्यात चुलते डॉ. मंडलिक यांच्याकडे राहत होता. घरची सर्व मंडळी लग्नासाठी बाहेर गेली असल्यामुळे सौरभ घरी एकटाच होता. दिवसभर फोन उचलत नसल्याने रात्री ९ वाजता कुटुंबीय घरी आल्यावर ही बाब त्यांच्या लक्षात आली.

याबाबत अकोले पोलिसांना माहिती मिळताच प्रभारी पोलीस निरीक्षक काळे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केल्यानंतर सौरभचा मृतदेह अकोले ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. आत्महत्यचे कारण अस्पष्ट असून पोलीस तपास करत आहेत.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_इयत्ता बारावीमध्ये शिकत असलेल्या सौरभ तात्यासाहेब मंडलिक(वय १८) या विद्यार्थ्यांने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रात्री नऊ वाजेच्या सुमारास अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे उघडकीस आलीय....

VO_ अकोले शहरातील सारडा पेट्रोल पंपाच्या मागे डॉ. मंडलिक हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावर सौरभ याने स्लब च्या हुकाला सुताच्या दोरीने गळफास घेऊन जीवन संपविले. इयत्ता बारावीची सुरु असल्याने त्याने ज्या खोलीत आत्महत्या केली तिथे सर्व पुस्तके वह्या नोटस अस्तव्यस्त पडलेल्या होत्या, तर त्या बाजूलाच वडापाव खालेला असावा असे आढळून आले. मॉडर्न हायस्कूल अकोले येथे विज्ञान शाखेत इयत्ता बारावीमध्ये तो शिकत होता..सध्या त्याची परीक्षा सुरु होती....

VO_मयत सौरभ चे वडील शिक्षक असून चुलते डॉक्टर आहेत. त्याला आई वडील बहिण असून तो अकोल्यात डॉ. मंडलिक यांच्याकडे राहत होता. घरची सर्व मंडळी लग्नासाठी बाहेर गेली होती सौरभ दुपारपासून एकटाच घरी होता तो दुपारपासून फोन उचलत नव्हता रात्री नऊ वाजता हि मंडळी घरी आल्यावर हि बाब लक्षात आली. याबाबत अकोले पोलिसांना समजताच प्रभारी पोलीस निरीक्षक काळे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केल्यानंतर सौरभचा मृतदेह अकोले ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन पाठवण्यात आलाय....
Body:25 Feb Shirdi Akola Student SuicideConclusion:25 Feb Shirdi Akola Student Suicide
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.