ETV Bharat / state

तेलंगणा राज्याच्या कृषिमंत्र्यासह 11 आमदार महाराष्ट्र दौऱ्यावर, शिर्डीतील द्राक्षाची शेती पाहून झाले थक्क - द्राक्ष शेती शिर्डी अरविंद कोते

राहाता तालुका हा पेरूची बाजारपेठ म्हणून माहीत होते, पण प्रत्यक्षात येथील द्राक्षाची शेती पाहून आपण थक्क झालो असल्याची प्रतिक्रिया, तेलंगणाचे कृषिमंत्री एस. निरंजन रेड्डी ( Telangana Agriculture Minister in shirdi ) यांनी दिली.

Telangana Agriculture Minister Maharashtra tour
द्राक्ष शेती शिर्डी तेलंगणा कृषिमंत्री भेट
author img

By

Published : Mar 19, 2022, 7:48 AM IST

शिर्डी (अहमदनगर) - राहाता तालुका हा पेरूची बाजारपेठ म्हणून माहीत होते, पण प्रत्यक्षात येथील द्राक्षाची शेती पाहून आपण थक्क झालो असल्याची प्रतिक्रिया, तेलंगणाचे कृषिमंत्री एस. निरंजन रेड्डी यांनी दिली. शिर्डीतील द्राक्ष उत्पादकांनी देशातील बाजार पेठेबरोबरच युरोपातील बाजार पेठेचा आभ्यास करावा, असे आवाहन तेलंगणाचे कृषिमंत्री एस. निरंजन रेड्डी ( Telangana Agriculture Minister in shirdi ) यांनी केले.

माहिती देताना कृषिमंत्री

हेही वाचा - Balasaheb Thorat Reaction : फडणवीसांनी आरशासमोर उभे राहावे म्हणजे त्यांना पुढचा विरोधी पक्षनेता दिसेल - बाळासाहेब थोरात

रेड्डी हे 11 आमदारांसह अहमदनगर, तसेच जळगाव जिल्ह्याच्या दोन दिवसीय अभ्यास दौऱ्यानिमित्ताने शुक्रवारी शिर्डीत आले होते. यावेळी रेड्डी यांच्याबरोबर आलेल्या आमदारांनी शिर्डी येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी अरविंद कोते यांच्या फार्म हाऊसवर द्राक्ष शेतीची माहिती घेतली. यावेळी कृषिमंत्री रेड्डी यांनी सांगितले की, देशभरातील प्रख्यात फळ उत्पादकांच्या शेतीची माहिती घेण्यासाठी आमचा दौरा असून शिर्डीतील अरविंद कोते यांनी द्राक्ष शेतीला आधुनिकतेची जोड देवून उच्चत्तम दर्जाची द्राक्षे निर्माण केली आहे. सध्या शेतकऱ्यांना त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला शास्वत बाजारपेठ नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अलिकडच्या काळात युवक मोठ्या पगाराच्या नोकऱ्या सोडून शेती व्यवसायाकडे वळत आहेत. जगातील बाजारपेठांचा ते आभ्यास करत आहेत. आजच्या काळात तरुणांचा शेतीकडील वाढता कल हा शेतीव्यावसायाच्या उर्जितावस्थेला हातभार लावणारा ठरेल, असा विश्वासही मंत्री रेड्डी यांनी व्यक्त केला.

अरविंद कोते यांनी मंत्री रेड्डी यांच्यासह उपस्थित 11 आमदारांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन शिर्डीत स्वागत केले. जिल्ह्यातील द्राक्ष आणी पेरू फळ बागांविषयी कृषितज्ञ मधुकर दंडवते, विनायक दंडवते, शिर्डी नगरपंचायतचे प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते, सदाशिव रोहम यांच्याबरोबर मंत्री रेड्डी यांनी संवाद साधला. यावेळी विनायक कोते, हौसिराम कोते यांच्यासह शिर्डी राहाता येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजीराव जगताप, राहाता तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे यांनी उपस्थीत कृषिमंत्री आणी आमदारांना नगर जिल्ह्यातील शेती आणी सिंचनाची माहिती दिली.

हेही वाचा - Holi celebrated Sai Baba temple : साईबाबांच्या मंदिरात 'अशा' पद्धतीने साजरी झाली होळी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.