ETV Bharat / state

१८०० फूट खोलीच्या हरिसचंद्र गडाच्या कोकण कड्यावरून २ चिमुकलींचं चित्तथरारक रॅपलिंग - श्रावणी वैद्य रॅपलिंग

अकोले येथील श्रावणी वैद्य आणि तनुष्का जाधव या दोन आठ-दहा वर्षाच्या चिमुरड्या मुलींनी हरिसचंद्र गडाच्या कोकण कड्यावर एक हजार आठशे फूट रॅपलिंग करून गिर्यारोहण क्षेत्रात नवीन इतिहास रचला.

10 years old girls rappelling Harishchandragad
१८०० फूट खोलीच्या हरिसचंद्र गडाच्या कोकण कड्यावरून दोन चिमुकलीचे चित्तथरारक रॅपलिंग
author img

By

Published : Apr 8, 2021, 4:48 PM IST

अहमदनगर - जिल्ह्यातील अकोले येथील श्रावणी वैद्य आणि तनुष्का जाधव या दोन आठ-दहा वर्षाच्या चिमुरड्या मुलींनी हरिसचंद्र गडाच्या कोकण कड्यावर एक हजार आठशे फूट रॅपलिंग करून गिर्यारोहण क्षेत्रात नवीन इतिहास रचला. इतक्या लहान वयात अठराशे फूट रॅपलिंग करीत कोकण कडा उतरण्याच्या त्यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.

अहमदनगर पुणे आणि ठाणे जिल्ह्याच्या सरहद्दीवर उभ्या असणाऱ्या हरिसचंद्र गडाचा कोकण कडा निसर्गाचा अदभुत आविष्कार आहे. सुमारे दोन हजार फूट उंचीचा अंतर्वक्र आकाराचा हा कडा पाहणाऱ्यांच्या उरात धडकी भरवतो. अर्थात त्यामुळेच या कड्यावरचे रॅपलिंग धाडसी गिर्यारोहकांना नेहमी आव्हान देत असते. नुकतेच अकोले येथील घनचक्कर ट्रेकर्स आणि पुणे येथील एसएल ऍडव्हेंचर यांनी कोकण कड्यावर रॅपलिंगचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोकण कड्याच्या मध्यातून रॅपलिंग करण्यात आले. अठराशे फुटाचे रॅपलिंग तीन टप्प्यात करण्यात आले. यातील पहिला टप्पा जवळपास नऊशे फुटाचा सर्वात आव्हानात्मक. कारण यात कड्याच्या कातळाला स्पर्शच होत नाही. कातळ रॅपलिंग करणाऱ्यापासून अडीचशे ते तीनशे फूट आत असतो. दुसरा टप्पा पाच सहाशे फुटांचा वरून आलेले दगडधोंडे या ठिकाणी अडकलेले आहेत. पाय लागून ते खाली पडू नये म्हणून जपून रॅपलिंग करावे लागते.

१८०० फूट खोलीच्या हरिसचंद्र गडाच्या कोकण कड्यावरून २ चिमुकलींचं चित्तथरारक रॅपलिंग
दोन दिवसांच्या रॅपलिंग शिबिरात पहिल्या दिवशी तनुष्का आणि श्रावणीने रॅपलिंग केले. मोहिमेचे प्रमुख लहू उघडे यांनी प्रथम या मुलींची मुलाखत घेऊन त्यांची मानसिक तयारी केली. प्रथम तनूने रॅपलिंग केले. सुरवातीला ती थोडी घाबरली होती. पण उपस्थित असणाऱ्यांनी प्रोत्साहन देताच ती बिनधास्त झाली आणि सरसर खाली गेली. नंतर श्रावणाचा नंबर होता. तिनेही आधी घाबरत पण नंतर बिनधास्त होत आत्मविश्वासाने रॅपलिंग करीत अठराशे फुटाचा अजस्त्र कडा लीलया रॅपल केला.
विशेष म्हणजे रॅपलिंग झाल्यानंतर या दोघींनी नळीच्या वाटेने गडाचा माथा गाठला. गडावर जाणारी ही सर्वात अवघड वाट आहे. उरावर येणारी चढण, मोठमोठे दगड धोंडे यातून वाट काढत दोघी इतरांबरोबर गडावर पोहचल्या. तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते. गडावर या दोघींचे जोरदार स्वागत करण्यात आले. दुसऱ्या दिवशीच्या मोहिमेत 26 पुरुष आणि 5 महिला असे 31 जण सहभागी झाले होते.
श्रावणी ही अकोले येथील व्यावसायिक अमित वैद्य यांची मुलगी वैद्य हे स्वतः चांगले ट्रेकर आहेत. घनचक्कर ट्रेकर्सच्या माध्यमातून ते विविध पर्वतरोहण मोहीम राबवित असतात. अकोले तालुक्यातील सर्व गडकिल्ले त्यांनी पालथे घातले आहेत. सध्या चौथीच्या वर्गात शिकत असणारी श्रावणी तीन वर्षाची असल्यापासून ट्रेकिंग मोहिमेत सहभागी होत आहे. तर तनुष्काही मागील दोन वर्षांपासून ट्रेकिंग करत असते. या दोघींच्या कोकण कडा रॅपलिंगचे स्वागत करताना भविष्यात त्या निश्चितच यशस्वी गिर्यारोहक होतील व एक दिवस एव्हरेस्ट शिखर सर करतील, असा विश्वास ट्रेकर्संनी व्यक्त केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.