क्वालालंपूर - भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉयला मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला आहे. थायलंडच्या शिथीकॉम थामसिनने पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीतील संघर्षपूर्ण लढतीत प्रणॉयचा 12-21, 21-16, 21-14 असा पराभव केला.
HS Prannoy loses to Sitthikom Thammasin of Thailand 21-12 16-21 14-21 in #R32 of #MalaysiaOpenSuper750
— Badminton Addict (@bad_critic346) April 3, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The Thai was promoted from qualifier as NgKaLong withdrew!
">HS Prannoy loses to Sitthikom Thammasin of Thailand 21-12 16-21 14-21 in #R32 of #MalaysiaOpenSuper750
— Badminton Addict (@bad_critic346) April 3, 2019
The Thai was promoted from qualifier as NgKaLong withdrew!HS Prannoy loses to Sitthikom Thammasin of Thailand 21-12 16-21 14-21 in #R32 of #MalaysiaOpenSuper750
— Badminton Addict (@bad_critic346) April 3, 2019
The Thai was promoted from qualifier as NgKaLong withdrew!
जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत 34 स्थानी असलेल्या थामसिनने 21 क्रमांकावर असलेल्या भारताच्या प्रणॉयचा ५६ मिनीटांमध्ये पराभव केला. मलेशिया ओपन बैडमिंटन स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत एकाही भारतीयाला या स्पर्धेचे जेतेपद मिळवता आलेले नाहीय.
प्रणॉयच्या अगोदर दुसरा भारतीय खेळाडू समीर वर्माला चीनच्या शी युकीच्या हाते पराभव स्विकारावा लागला होता. युकीने समीरचा 22-20, 21-23, 21-12 असा पराभव केला. या स्पर्धेत पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल आणि किदम्बी श्रीकांत यांच्याकडून भारताला मोठ्या अपेक्षा आहेत.