ETV Bharat / sports

भाऊ सर्वांना शुभेच्छा सांग! पंतप्रधान मोदींचा भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीतला फोन - प्रशिक्षक

भारतीय पुरूष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कास्य पदक जिंकलं. यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग याच्याशी फोनवर बातचित केली.

tokyo-olympics-hockey-pm-narendra-modi-talks-to-indian-hockey-team-players-and-manpreet-singh
भाऊ सर्वांना शुभेच्छा सांग! पंतप्रधान मोदींचा भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीतला फोन
author img

By

Published : Aug 5, 2021, 2:34 PM IST

Updated : Aug 5, 2021, 2:45 PM IST

टोकियो - भारतीय पुरूष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला. कर्णधार मनप्रीत सिंगच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने जर्मनीचा 5-4 ने पराभव करत कास्य पदक जिंकलं. यासह भारतीय संघाने 41 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला. देशभरात या विजयानंतर जल्लोष साजरा केला जात आहे. या दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय कर्णधार मनप्रीत सिंग याच्याशी फोनवर बातचित केली. वाचा मोदी आणि खेळाडूंमधील चर्चा...

मनप्रीत सिंग : नमस्कार सर

पंतप्रधान मोदी : मनप्रीत जी, खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आणि तुमच्या संघाने चांगलं काम केलं आहे.

मनप्रीत सिंग : थॅक्यू सर.

पंतप्रधान मोदी : संपूर्ण देश जल्लोष साजरा करत आहे.

मनप्रीत सिंग : थॅक्यू सर. तुम्हा सर्वांचे आशिर्वाद आमच्या सोबत होते.

पंतप्रधान मोदी : त्या दिवशी तुझ्या आवाजात थोडीशी वेगळी होती. आज एकदम बरोबर आहे.

मनप्रीत सिंग : तुमचं मोटिवेशन आमच्या संघासाठी महत्वाचं ठरलं

पंतप्रधान मोदी : तुम्हा सर्वाचे कष्ट काम करत आहे. तुमच्या प्रशिक्षकांनी देखील यासाठी खूप मेहनत घेतली आहे. माझ्याकडून सर्व खेळाडूंना शुभेच्छा दे भावा. 15 ऑगस्ट रोजी आपण सगळे जण भेटू यासाठी मी सर्वांना आमंत्रण दिलं आहे. तुझे प्रशिक्षक तुझ्यासोबत आहेत का?

प्रशिक्षक ग्राहम रीड : आम्हाला आशा आहे की, आम्ही तुम्हाला प्राउड फिल केलं. सेमीफायनल नंतर तुम्ही आमच्याशी केलेली चर्चा आणि तुमचे शब्द आमच्यासाठी प्रेरणादायी ठरले.

पंतप्रधान मोदी : शुभेच्छा शुभेच्छा. तुम्ही तर इतिहास रचलात. माझ्याकडे शब्द नाहीत. तुमच्या कठोर परिश्रमाचे हे फळ आहे.

मनप्रीत सामना संपल्यानंतर काय म्हणाला...

सामना संपल्यानंतर मनप्रीतने माध्यमाशी बातचित केली. यात तो म्हणाला की, या ऑलिम्पिकसाठी खेळाडूंनी खूप परिश्रम केलं होतं. ते पदकास डिजर्व करतात. हा आनंद व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. श्रीजेशने सांगितलं होतं, हा प्रेशरवाला सामना आहे. आपण एन्जॉय करायला हवं आणि नॅचरल खेळ करायला हवं. जर आम्ही पदकाचा विचार करत बसलो असतो तर परफॉर्म करू शकलो नसतो. आम्ही फक्त आमचे बेस्ट दिलं आणि अखेरपर्यंत हार मानली नाही.

हेही वाचा - टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचणाऱ्या भारतीय हॉकी संघातील खेळाडूविषयी जाणून घ्या...

हेही वाचा - Tokyo Olympics : पुरूष हॉकी संघाने 41 वर्षांनंतर जिंकलं पदक, जर्मनीला नमवत 'कांस्य'वर केला कब्जा

Last Updated : Aug 5, 2021, 2:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.