ETV Bharat / sports

Tokyo Olympics : सुवर्ण स्वप्नभंग, भारतीय हॉकी संघाचा बेल्जियमकडून पराभव - india

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरूष हॉकी संघाचा उपांत्य फेरीत बेल्जियमकडून पराभव झाला. बेल्जियमने हा सामना 5-2 अशा फरकाने जिंकला.

Tokyo Olympics : belgium beat india by 5-2 in semi final
Tokyo Olympics : सुवर्ण पदकाच्या स्वप्नांना सुरूंग; भारताचा बेल्जियमकडून पराभव
author img

By

Published : Aug 3, 2021, 9:28 AM IST

Updated : Aug 3, 2021, 10:11 AM IST

टोकियो - टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरूष हॉकी संघाचा उपांत्य फेरीत बेल्जियमकडून पराभव झाला. बेल्जियमने हा सामना 5-2 अशा फरकाने जिंकला. या पराभवासह तमाम भारतीयांचे सुवर्ण पदकाचे स्वप्न भंगले आहेत. पहिल्या तीन क्वार्टरमध्ये चांगला खेळ करणाऱ्या भारतीय संघाला अखेरच्या क्वार्टरमधील चूका भोवल्या आणि भारताने हा सामना गमावला. दरम्यान, भारताला कांस्य पदक जिंकण्याची आणखी एक संधी आहे.

विश्वविजेता बेल्जियम संघाला सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. यावर लॉकी लूयपाएर्ट याने गोल करत बेल्जियमला 1-0 ने आघाडी मिळवून दिली. त्यानंतर भारतीय संघाने आक्रमक खेळ केला. तेव्हा भारताला 7व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण यावर भारताला गोल करण्यात अपयश आलं. यानंतर भारतीय संघाला आणखी एक पेनाल्टी कॉर्नर मिळाला. यावर हरमनप्रीत सिंगने गोल करून संघाला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. पुढच्याच मिनिटाला मनदीप सिंगने रिव्हर्स फटका मारून अप्रतिम मैदानी गोल करत भारताची आघाडी 2-1 अशी वाढवली.

सामन्याच्या 11व्या मिनिटाला भारताला क्वॉर्नर मिळाला. यावर गोल करून, आघाडी वाढवण्याची नामी संधी भारतीय संघाकडे होती. पण बेल्जियमच्या गोलकिपरने भारताला ही संधी साधू दिली नाही. पहिल्या क्वार्टरमध्ये भारताची आघाडी 2-1 अशी कायम होती. दुसऱ्या क्वार्टरमध्ये बेल्जियमने आक्रमक धोरण अवलंबले. तेव्हा 19व्या मिनिटाला त्यांना पेनाल्टी कॉर्नर मिळाला. यावर अॅलेक्सझांडर हेंड्रीक्स याने कॉर्नरवर गोल करून बेल्जियमला 2-2 अशी बरोबरी मिळवून दिली. 24व्या मिनिटाला मनदीप सिंग गोल करताना चूकला आणि भारताने आघाडी घेण्याची आणखी एक संधी गमावली.

दुसऱ्या क्वार्टरमध्ये बेल्जियमला 6 कॉर्नर मिळाले. पण त्यांचे पाच प्रयत्न गोलरक्षक पी आर श्रीजेश व भारताच्या बचावपटूंनी अपयशी ठरवले. हाफ टाईममध्ये 2-2 अशी बरोबरी राहिली. पहिल्या 30 मिनिटांच्या खेळात बेल्जियमने 7 पेनल्टी कॉर्नरपैकी 2 गोल करण्यात यश मिळवले, भारताने 4 पैकी एकावर गोल केला.

तिसऱ्या क्वार्टरच्या भारतीय खेळाडू छोटे छोटे पास देत चेंडूवर ताबा कायम राखत होते. तेव्हा 38व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. यावर हरमनप्रीतला गोल करता आला नाही. अशात भारताचा कर्णधार मनप्रीत सिंग याला ग्रीन कार्ड मिळाले आणि त्यामुळे भारताला 10 खेळाडूंसहच खेळावे लागले. त्यात पुढच्या मिनिटाला बेल्जियमला पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण भारतीय खेळाडूंची त्यांचे गोल करण्याचे मनसूबे हाणून पाडले.

बेल्जियमला यानंतर आणखी दोन पेनाल्टी कॉर्नर मिळाला. यातील पेनाल्टी कॉर्नरवर हेंड्रीक्सने गोल करून बेल्जियमनला 3-2 अशी आघाडी मिळवून दिली. आघाडी मिळवल्यानंतर बेल्जियमने चेंडूवर ताबा राखण्यावर भर दिला आणि यात ते यशस्वी ठरले. याचा दबाव भारतीय संघाच्या खेळावर जाणवला. भारतीय खेळाडूंनी चूका केल्या. यात बेल्जियमनला सलग दोन कॉर्नर मिळाले. पण भारतीय बचावपटूंनी ते रोखले. 53व्या मिनिटाला बेल्जियमला स्ट्रोक्स मिळाला आणि हेंड्रीक्सने गोल करून आघाडी 4-2 अशी भक्कम केली. अखेरीस आणखी एक गोल करत बेल्जियमनने भारताचा 5-2 ने पराभव केला.

Last Updated : Aug 3, 2021, 10:11 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.