टोकियो - भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटला उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्कारावा लागला. 53 किलो वजनी गटात बेलारुसच्या वनेस हिने विनेशचा 9-3 असा एकतर्फा पराभव केला. दरम्यान, विनेशला कांस्य पदकासाठी सामना खेळण्याची आणखी एक संधी मिळू शकते.
विनेश फोगाटवर बेलारुसच्या महिला कुस्तीपटूने सामन्याच्या सुरूवातीपासूनच संपूर्ण वर्चस्व मिळवलं. ती 5-2 ने आघाडीवर होती. तिने विनेशला सामन्यात पुनरागमनाची संधीच दिली नाही. अखेरीस विनेशला 9-3 ने पराभव स्वीकारावा लागला.
विनेश फोगाटला कांस्य पदकाच्या सामन्यासाठी कशी मिळू शकते संधी
कुस्तीमध्ये रेपेचाज हा नियम आहे. या नियमानुसार, जर बेलारुसची खेळाडू जर अंतिम फेरीत पोहोचली तर विनेशला कांस्य पदकासाठी सामना खेळण्याची संधी मिळू शकते. कुस्तीमध्ये दोन कांस्य पदक दिले जातात.
उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या दोन खेळाडूंमध्ये कांस्य पदकासाठी सामना होतो. यातील विजेत्याला एक पदक दिलं जातं. तर दुसरे पदकाची प्रक्रिया थोडीशी किचकट आहे. यात अंतिम फेरीत पोहोचलेल्या दोन खेळाडूंनी उपांत्यपूर्व फेरीत ज्या खेळाडूंना पराभव केला होता. त्या खेळाडूंमध्ये कांस्य पदकासाठी सामना होतो. यातील विजेत्याला दुसरं कांस्य पदक दिलं जातं.
दरम्यान, रेपेचाज नियमाच्या आधारावर भारताच्या अनेक कुस्तीपटूंनी पदकं जिंकली आहेत. यात सुशील कुमार याने बिजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकलं होतं. तर योगेश्वर दत्त याने रिओ ऑलिम्पिक तर साक्षी मलिक याने लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची कमाई केली होती.
हेही वाचा - Tokyo Olympics : पुरूष हॉकी संघाने 41 वर्षांनंतर जिंकलं पदक, जर्मनीला नमवत 'कांस्य'वर केला कब्जा
हेही वाचा - Tokyo Olympic : भारतीय महिला हॉकी संघाची 'सुवर्ण' वाट अर्जेंटिनाने रोखली