हैदराबाद - टोकिओ ऑलिम्पिकमध्ये भारताची तिसऱ्या दिवसाची सुरूवात वाईट झाली होती. महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारताची निराशा झाली. पण, यानंतर बॅडमिंटनमध्ये पहिल्या फेरीत पीव्ही सिंधूच्या विजयाने आशा पल्लवीत झाल्या. तर पुरूषांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेच्या दुसर्या नेमबाजी स्पर्धेतही भारताला निराशेचा सामना करावा लागला. याच निराशेला कमी करण्याचे काम केले आहे, ते मेरी कॉमच्या मेडलने केले आहे. नेमबाजीमध्ये भारताला चौथ्या दिवशी करामत करावी लागणार आहे. अंगद वीरसिंग आणि मैराज अहमद यांच्याकडून चौथ्या दिवशी मोठी आशा आहे. हा सामना सकाळी 6.30 वाजता सुरू होणार आहे.
चौथ्या दिवशीही नेमबाजी स्पर्धा होणार आहे आणि पुन्हा एकदा भारताची पदक मिळविण्यासाठी या नेमबाजांकडे लक्ष राहणार आहे. पहिल्या तीन दिवसात भारताला रायफल स्पर्धेत निराशाच मिळाली आहे. अशावेळी चौथ्या दिवशी काय घडतं हे पाहणं तितकचे महत्त्वाचे ठरणार आहे. सोबत या दिवशी सगळ्यांच्या नजरा भवानी देवी यांच्या तलवारबाजीकडेही लागल्या आहेत. भवानी देवी आपला पहिला ऑलिम्पिक खेळत आहे. त्यामुळे या स्पर्धेत आपला पूर्ण जोर लावण्याचा प्रयत्न भवानी देवी करणार आहे.
असा असेल 26 तारखेचा भारताचा वेळापत्रक
फेंसिंग (तलवारबाजी)
सकाळी 5.30 वाजता - महिला साबेर वैयक्तिक टेबल 64 (भवानी देवी विरूद्ध नादिया बेन अजीजी)
आर्चरी
सकाळी 6 वाजता- पुरुष संघ 1/8 एलिमिनेटर्स (अतानु दास/प्रवीण जाधव/तरुणदीप राय विरूद्ध इफल अब्दुलिन/डेनिस गानकिन/सैन्जार मुस्साएव)
शूटिंग (नेमबाजी)
सकाळी 6:30 वाजता- स्कीट मेंस क्वॉलीफिकेशन- दूसरा दिवस (माईराज अहमद खान, अंगद वीरसिंह बाजवा)
टेबल टेनिस
सकाळी 6:30 वाजता- पुरुष एकेरी फेरी 3 (शरत कमल विरूद्ध टिआगो अपोलोनिया)
सकाळी 8.30 वाजता- पुरुष एकेरी फेरी 2 (सुतिर्था मुखर्जी विरूद्ध फू यू)
सेलिंग
सकाळी 8:35 वाजता- पुरुष एकेरी डिंघे- लेजर- रेस 2 (विष्णु सरवनन)
बॅडमिंटन
सकाळी 9:10 वाजता- पुरुष दुहेरी गट प्ले स्टेज- ग्रुप ए (सात्विकसाइराज रेंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी विरूद्ध मार्कस फेर्नाल्डी गिडिओन आणि केविन सुकमउल्जिओ)
टेनिस
सकाळी 9:30 वाजता- पुरुष एकेरीची दुसरी फेरी (सुमित नागल विरूद्ध डेनिल मेदवेदेव)
सेलिंग
सकाळी 11:05 वाजता- विमेंस वन पर्सन डिंघे- लेजर रेडियल- रेस 3 (नेत्रा कुमानन)
टेबल टेनिस
दुपारी 12 वाजता- महिला एकेरी फेरी 3 (मनिका बत्रा विरूद्ध सोफिया पोलकैनोवा)
शूटिंग
दुपारी 12:20 वाजता- स्कीट मेन फायनल (सब्जेक्ट ऑफ क्वॉलीफिकेशन)
बॉक्सिंग
दुपारी 3:06 वाजता- पुरुष मध्यम (69-75 किलो)- राउंड ऑफ 32 (आशीष कुमार विरूद्ध एर्बीके तुओहेटा)
स्विमिंग
सायंकाळी 3:50 वाजता- पुरूष 200 मीटर बटरफ्लाई- हीट 2 (साजन प्रकाश)
हॉकी
संध्याकाळी 5:45 वाजता- महिलांचा पूल ए (भारत बनाम जर्मनी)