ETV Bharat / sports

Tokyo Olympics Day 16: एका 'गोल्ड'सह भारताची पदक तालिकेत झेप.. आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी

भारताचा स्टार जैवलिन थ्रोअर (भालाफेक पटू) नीरज चोप्राने इतिहास घडवला आहे. त्याने भालाफेकीत देशासाठी सुवर्ण जिंकले आहे. त्याचा सर्वश्रेष्ठ थ्रो 87.58 मीटर लांब होता. ऑलिम्पिकमध्ये व्यक्तिगत स्पर्धेत भारताला १३ वर्षानंतर दुसरे गोल्ड मिळाले आहे. बीजिंग ऑलिम्पिक 2008 मध्ये नेमबाज अभिनव बिंद्रा याने हा कारनामा केला होता.

tokyo-olympics-
tokyo-olympics-
author img

By

Published : Aug 8, 2021, 3:27 AM IST

हैदराबाद - स्टार अ‌ॅथलीट नीरज चोप्रा ने भालाफेकीत स्वर्ण पदक जिंकत ऑलिम्पिकच्या इतिहासात सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केले आहे. भारताने ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच सात पदके जिंकली आहेत. त्यामध्ये एक सुवर्ण, दोन रौप्य तर चार कांस्य पदके सामील आहेत. यापूर्वी भारताने लंडन ऑलिम्पिकमध्ये ६ पदके जिंकली होती. नीरजच्या सुवर्णफेकीमुळे भारत टोकियो ऑलिम्पिकच्या पदक तालिकेत 47 व्या स्थानावर पोहोचला आहे.

भारताने टोकियो ऑलिम्पिकची सुरुवात पहिल्याच दिवशी वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानू हिने जिंकलेल्या पदकाने केली होती. त्यानंतर पीव्ही सिंधूने बॅडमिंटनमध्ये भारतला दुसरे पदक दिले. सिंधु ऑलिम्पिकच्या इतिहासात सलग दुसऱ्यांदा पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू बनली.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

त्यानंतर तिसरे पदक आसामची युवा बॉक्सर लवलीना बोरगेहन हिने मिळवून दिले. पुरुषांच्या पदकाचे खाते कुस्तीमध्ये रवि दहियाने रौप्य जिंकून खोलले होते. त्यानंतर पुरुष हॉकी टीमने 41 वर्षानंतर कांस्य पदक जिंकून पदकांची दुष्काळ संपवला होता. भारताला सहावे पदक बजरंग पूनियाने कांस्यच्या रुपात दिले. त्यानंतर काही वेळातच या पदकाचा रंग नीरज चोप्राने सुवर्ण केला.

पदक तालिकेत कितव्या नंबरवर भारत ?

अनेक भारतीय अ‌ॅथलीट यावेळी पदक जिंकण्याच्या अगदी जवळ जाऊन अखेरच्या वेळी अपयशी ठरले. त्यामध्ये मनु भाकर, सौरव चौधरी, सीमा बिस्ला, दीपक पूनिया, कमलजीत कौर, अदिति अशोक आणि भारतीय महिला हॉकी टीम सामील आहे. जर हे खेळाडू यशस्वी झाले असते तर भारताची पदकांची संख्या पहिल्यांदाच दोन अंकी झाली असती. भारत टोकियो ऑलिम्पिकच्या पदक तालिकेत 47 व्या स्थानावर पोहोचला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.