ETV Bharat / sports

वडिलांच्या आठवणीत भावूक झाली 'हॅट्ट्रिक गर्ल' वंदना कटारिया, पाहा व्हिडिओ

भारतीय महिला हॉकी संघाची खेळाडू वंदना कटारिया आज तिच्या घरी पोहोचली. घरी पोहोचताच ती वडिलांच्या आठवणीत भावूक झाली होती. दरम्यान, वंदनाच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा ती टोकियो ऑलिम्पिकसाठी बंगळुरूमध्ये सराव करत होती.

hat-trick-girl-vandana-katariya-gets-emotional-remembering-her-father
वडिलांच्या आठवणीत भावूक झाली 'हॅट्ट्रिक गर्ल' वंदना कटारिया, पाहा व्हिडिओ
author img

By

Published : Aug 11, 2021, 7:06 PM IST

हरिद्वार - विजयानंतरचा जल्लोष तर तुम्ही अनेकदा पाहिला असेल. पण पराभूत होऊन देखील सर्वांचं मन जिंकण्याचा पराक्रम भारतीय महिला हॉकी संघाने केला. भारतीय महिला हॉकी संघाची खेळाडू वंदना कटारिया आज तिच्या हरिद्वार येथील घरी पोहोचली. तिचे यावेळी जोरदार स्वागत करण्यात आले. या दरम्यान वंदना कटारिया भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. तिने खूप संघर्ष करत हे यश मिळवलं आहे. याविषयी तिनं सांगितलं की, आम्ही बहिणी शूट एकमेकांना शेअर करत हॉकी खेळत होतो.

वंदना कटारियाचे विमानतळावर आल्यानंतर जंगी स्वागत झालं.

वंदना कटारियाने सांगितलं की, तिच्या एक जोड शूट देखील खरेदी करण्यासाठी पैसै नव्हते. वंदना कटारियाने तिच्या वडिलांची आठवण करताना सांगितलं की, आज ते हयात नाहीत. मी त्यांचे अखेरचे दर्शन सुद्धा घेऊ शकले नाही.

वंदना कटारिया बोलताना...

वंदाना कटारियाने पुढे म्हणाली की, जेव्हा ती टोकियोहून परत येत होती. तेव्हा तिच्या मनात हेच येत होतं की, घरी जाऊन कसं फील करेन. कारण तिचे वडिल तिच्यासोबत नाहीत. वडिल ज्या खोलीत झोपायचे. ज्या खूर्चीवर बसून ते वंदनाशी बोलायचे आता ती खूर्ची रिकामी आहे. वंदनाने सांगितलं की, वडिल जेव्हा भेटायचे तेव्हा मला भारतासाठी पदक जिंकण्याविषयी सांगत असतं. वंदनाने तिच्या वडिलांची ती इच्छा पूर्ण करणार असल्याचं सांगितलं.

वंदना कटारियाने रचला इतिहास

भारतीय महिला हॉकी संघाची खेळाडू वंदना कटारिया आज तिचे गाव हरिद्वार जिल्ह्यातील रोशनाबाद येथे पोहोचली. तिथे तिचे जोरदार स्वागत करण्यात आले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये वंदना कटारियाच्या नावे एक रेकॉर्ड आहे. तिने एका सामन्यात तीन गोल करत हॅट्ट्रिक गोल केलं. या कामगिरीसह ती भारतीय महिला हॉकी इतिहासात ऑलिम्पिकमध्ये हॅट्ट्रिक गोल करणारी पहिली खेळाडू ठरली. तिने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात ही कामगिरी केली होती.

हेही वाचा - कुस्ती महासंघाने विनेश फोगाटचं केलं निलंबन, जाणून घ्या काय आहे प्रकरण

हेही वाचा -women hockey team : ऑलिम्पिकमधील परफॉर्मन्स आगामी खेळांत मदत करेल - कर्णधार राणी रामपाल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.