भोपाल - जे स्वप्न पहिलं होतं. ते साकार झालं आहे. ऑलिम्पिक खेळताना वाटत होतं की सुवर्ण पदक आपलं असेल. पण उपांत्य सामन्यात पराभव झाला आणि आम्ही त्याला मुकलो. तेव्हा आम्ही कास्य पदक जिंकला. आता येणाऱ्या काळात पदकांचे रंग बदलण्याचे स्वप्न असल्याचं भारतीय पुरूष हॉकी संघाचा खेळाडू विवेक सागरने सांगितलं. विवेक सागरने ईटीव्ही भारतशी बातचित केली. यात त्याने त्याचा संघर्ष सांगितला.
विवेक सागरचे जोरदार स्वागत
विवेक सागर आज भोपाळला पोहोचला. विमानतळावर त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी क्रीडा मंत्री यशोधरा राजे सिधींया या देखील उपस्थित होत्या.
संघाचे फोकस फक्त पदकावर होते - विवेक सागर
ईटीव्ही भारतसोबत बोलताना विवेक सागर म्हणाला की, ऑलिम्पिकमध्ये या विजयानंतर आम्हाला असं वाटू लागलं की स्वप्न साकार झालं. हा विजय संपूर्ण संघाचा विजय आहे. या दरम्यान, आम्ही अनेक चढउतार पहिले पण आमचा फोकस फक्त पदकावर होता.
कुटुंबियांची मिळाली साथ
विवेक सागरला त्याच्या प्रवासात कुटुंबियाची चांगली साथ दिली. सुरूवातीच्या काळात विवेकच्या भावांनी त्याला मदत केली. याचे श्रेय तो भावाला देतो. विवेकने सांगितलं की, तो लहानपणापासून हॉकी खेळत आहे. यात त्याचा भाऊ त्याला मदत करतो. याचाच परिणाम आहे की, आज ऑलिम्पिकमध्ये विवेकने पदक जिंकलं.
विवेक सागर पुढे म्हणाला, मध्य प्रदेशमध्ये खेळाडूंना चांगल्या सुविधा मिळतात. येथील इन्फास्ट्रक्चर चांगला आहे. हॉकीच्या मैदानात एस्ट्रो आणि सिंथिटिक टर्फ आहेत. हे खेळाडूंसाठी चांगले वातावरण आहे. पण खेळाडूंना अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. कष्टानेच खेळाडू घडतो.
विवेक सागरला पुरस्कार
विवेक सागरने भारतीय जूनियर हॉकी संघाचे कर्णधारपद भूषवलं आहे. 2019 मध्ये त्याला हॉकी स्टार्ट अवार्ड्समध्ये रायजिंग स्टार ऑफ द ईयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
विवेक सागर 2018 फोर नेशन्स टूर्नामेंट, राष्ट्रकुल, चॅम्पियन्स ट्रॉफी, यूथ ऑलिम्पिक, न्यूझीलंड टेस्ट सीरीज, आशियाई स्पर्धा आणि 2019 अझलान शाह हॉकी टूर्नामेंट आणि ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरीज सारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय संघाचे सदस्य राहिला आहे. त्याने आतापर्यंत 62 हून अधिक सामन्यात भारताचे प्रतिनिधत्व केलं आहे.
हेही वाचा - कास्य पदक जिंकणाऱ्या मनप्रीत सिंगने आईच्या कुशीत घेतला विसावा, फोटो होतोय व्हायरल