ETV Bharat / sports

विम्बल्डन स्पर्धाः अग्रमानांकित अ‍ॅश्ले बर्टीचा पराभव; अमेरिकेच्या रिस्केने केला स्पर्धेत उलटफेर

author img

By

Published : Jul 8, 2019, 7:55 PM IST

जागतीक क्रमवारीत अग्रस्थानी असलेली ऑस्ट्रेलियाची महिला टेनिस खेळाडू अ‍ॅश्ले बर्टी हिला विम्बल्डन स्पर्धेमध्ये धक्कादायक पराभवाला समोरे जावे लागले. विम्बल्डन स्पर्धेच्या चौथ्या फेरीत बर्टीला अमेरिकेच्या एलिसन रिस्के हिने धूळ चारली.

विम्बल्डन स्पर्धाः अग्रमानांकित अ‍ॅश्ले बर्टीचा पराभव; अमेरिकेच्या रिस्केने केला स्पर्धेत उलटफेर

लंडन - जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेली ऑस्ट्रेलियाची महिला टेनिस खेळाडू अ‍ॅश्ले बर्टी हिला विम्बल्डन स्पर्धेमध्ये धक्कादायक पराभवाला समोरे जावे लागले. विम्बल्डन स्पर्धेच्या चौथ्या फेरीत बर्टीला अमेरिकेच्या एलिसन रिस्के हिने धूळ चारली.

रिस्के हिने एक तास ३७ मिनिट चाललेल्या सामन्यात ३-६, ६-२, ६-३ अशा सेटमध्ये बर्टीचा पराभव केला. २९ वर्षीय रिस्के हिचा ग्रँन्ड स्लॅममधील हे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन आहे. यापूर्वी तिने २०१३ मध्ये यूएस ओपन स्पर्धेमध्ये चौथी फेरी गाठली होती.

बर्टीने लागोपाठ १५ सामने जिंकले होते. ही विजयाच्या मालिकेला रिस्के हिने ब्रेक लावला आहे. सामन्यात रिस्के हिने पहिला सेट गमावला. त्यानंतर तिने आपला खेळ उंचावत दुसरा सेट ६-२ ने जिंकला. हाच धडाका तिने शेवटच्या सेटमध्ये सुध्दा कायम राखला. शेवटच्या सेट तिने ६-३ ने जिंकत सामनाही आपल्या नावे केला. रिस्के हिचा उपउपांत्य फेरीतील लढत अमेरिकेच्या सेरेना विल्यम्स हिच्याशी होणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.