न्यूयॉर्क - ब्रिटनची 18 वर्षीय युवा टेनिसपटू एमा राडुकानू हिने यूएस ओपन स्पर्धा जिंकली. तिने अंतिम सामन्यात कॅनडाच्या 19 वर्षीय लेला फर्नांडिस हिचा 6-4, 6-3 अशा फरकाने पराभव करत ग्रँडस्लॅमला गवसणी घातली. एमा 44 वर्षांनंतर ग्रँडस्लॅम जिंकणारी पहिली ब्रिटिश खेळाडू ठरली आहे.
एमा राडुकानू हिच्या आधी ब्रिटनच्या वर्जिनिया वेड यांनी विम्बलडन स्पर्धा जिंकली होती. त्यांनी हा कारनामा 1977 मध्ये केला. आता एमाने यूएस ओपन स्पर्धा जिंकली आहे. ती 1968 नंतर यूएस ओपन स्पर्धा जिंकणारी ब्रिटिश खेळाडू देखील ठरली.
यूएस ओपनच्या डेब्यूत विजेतेपदक पटकावणारी एमा राडुकानू दुसरी खेळाडू -
एमा राडुकानूचा हा यूएस ओपनमधील डेब्यू होता. डेब्यूत ती अंतिम फेरीत पोहोचणारी चौथी खेळाडू ठरली. याआधी पाम श्राइवर (1978) व्हीनस विल्यम्स (1997) आणि बियांका अँड्रीस्कू (2019) यांनी डेब्यू स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती. तसेच एमा बियांकानंतर डेब्यू स्पर्धेत विजेतेपद पटकावणारी दुसरी खेळाडू आहे.
एमा राडुकानूने सलग 20 सेट जिंकले -
आपली दुसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा खेळणारी एमा राडुकानू हिने यूएस ओपन स्पर्धेत आतापर्यंत सलग 20 सेट जिंकले आहेत. यात पात्रता फेरीतील तीन आणि मुख्य ड्रॉ मधील 6 सामन्यांचा समावेश आहे. याआधी 2016 मध्ये एंजेलिक कर्बर हिने एकही सेट न गमावता यूएस ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली होती.
ब्रिटनच्या राणीकडून एमा राडुकानूचे कौतुक -
एमा राडुकानू हिने यूएस ओपन स्पर्धा जिंकली. यानंतर ब्रिटनची राणी एलिजाबेथ यांनी एमाचे अभिनंदन केलं. त्यांनी आपल्या परिवाराच्या वेबसाईटवर एक मॅजेस लिहला. यात त्यांनी सांगितलं की, यूएस ओपन टेनिस चॅम्पियनशीप जिंकल्याबद्दल तुझे अभिनंदन. कमी वयात केलेली ही कामगिरी उल्लेखनीय आहे. हे यश कठोर कष्ठ आणि समर्पणाचा पुरावा आहे.
टेनिसमध्ये 1975 नंतर विश्व रॅकिंग सुरू करण्यात आल्यापासून 100 पेक्षा जास्त रॅकिंग असलेली महिला खेळाडू, अंतिम फेरीत पोहोचली आहे. राडुकानू क्रमवारीत 150व्या स्थानी आहे. याआधी 2009 मध्ये किम क्लिजस्टर्स यूएस ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली होती. तिने या स्पर्धेचे विजेतेपद देखील पटकावले होते.
हेही वाचा - टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी श्रीलंका संघाची घोषणा, 'या' 15+4 खेळाडूंना मिळाली संधी
हेही वाचा - IPL 2021 च्या उर्वरित हंगामाला सुरूवात होण्याआधीच इंग्लंडच्या 3 दिग्गज खेळाडूंची माघार