न्यूयॉर्क - जापानची नाओमी ओसाका हिने यूएस ओपन महिला सिंगलचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात तिने बेलारुसची व्हिक्टोरिया अझारेंका हिचा पराभव केला. पहिल्या सेटमध्ये पिछाडीनंतर तिने सामन्यात जबरदस्त वापसी करत विजय मिळवला. ओसाकाने अझारेंकाला १-६, ६-३, ६-३ असे नमवले.
-
A special message from your @usopen champion, @naomiosaka 😍 pic.twitter.com/Jgor8MmFFA
— wta (@WTA) September 13, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">A special message from your @usopen champion, @naomiosaka 😍 pic.twitter.com/Jgor8MmFFA
— wta (@WTA) September 13, 2020A special message from your @usopen champion, @naomiosaka 😍 pic.twitter.com/Jgor8MmFFA
— wta (@WTA) September 13, 2020
यूएस ओपनच्या महिला सिंगलचा अंतिम सामना यूएसटीए बिली किंग नॅशनल टेनिस सेंटरच्या कोर्टवर खेळवण्यात आला. या सामन्यात २२ वर्षीय ओसाकाने बाजी मारत कारकिर्दीतील दुसरे यूएस ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. ओसाकाचे हे तिसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे.
अझारेंकाने पहिल्या सेटमध्ये दमदार सुरुवात करत पहिला सेट १-६ ने जिंकला. अझारेंकाच्या झंझावतीसमोर ओसाकाचा पहिल्या सेटमध्ये निभाव लागला नाही. पण तिने दुसऱ्या सेटमध्ये शानदार पुनरागमन केले आणि तिने दुसरा सेट ६-३ असा जिंकत सामना बरोबरीत आणला. हाच झंझावत तिने अखेरच्या सेटमध्ये देखील कायम राखली. अखेरचा निर्णायक सेट देखील तिने ६-३ असा जिंकत ग्रँडस्लॅमवर आपले नाव कोरले.
-
2018 US Open 🏆
— US Open Tennis (@usopen) September 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
2019 @AustralianOpen 🏆
2020 US Open 🏆
Welcome to the 3️⃣-Slam club, @naomiosaka! pic.twitter.com/jc8kJtLBXC
">2018 US Open 🏆
— US Open Tennis (@usopen) September 12, 2020
2019 @AustralianOpen 🏆
2020 US Open 🏆
Welcome to the 3️⃣-Slam club, @naomiosaka! pic.twitter.com/jc8kJtLBXC2018 US Open 🏆
— US Open Tennis (@usopen) September 12, 2020
2019 @AustralianOpen 🏆
2020 US Open 🏆
Welcome to the 3️⃣-Slam club, @naomiosaka! pic.twitter.com/jc8kJtLBXC
अझारेंका तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचली होती. तिने याआधी २०१२ आणि २०१३ या वर्षी यूएस ओपन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. त्यावेळी सेरेना विल्यम्सने तिचा दोन्ही वेळा पराभव केला होता. ३१ वर्षीय अझारेंकाच्या नावे दोन ग्रँडस्लॅम आहेत. दरम्यान, ओसाका आणि अझारेंका आजघडीपर्यंत चार वेळा एकमेकांविरुद्ध खेळल्या आहेत. त्यात ओसाकाने ३ लढती जिंकल्या आहेत.
हेही वाचा - यूएस ओपन : विजेतेपदासाठी भिडणार ज्वेरेव आणि थीम
हेही वाचा - US Open : चुकीला माफी नाही..! रागात महिला अधिकाऱ्याला चेंडू मारल्याने जोकोविच अपात्र