ETV Bharat / sports

Us Open २०१९ : राफेल नदाल १९ व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदापासून दोन पाऊल दूर - Diego Schwartzman

राफेल नदाल आणि जागतिक क्रमवारीत २० व्या स्थानावर असलेल्या डिएगोमध्ये उपांत्यपूर्व फेरीतील लढत २ तास ४६ मिनिटे रंगली. या लढतीत नदालने ६-४, ७-५, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.

Us Open २०१९ : राफेल नदाल १९ व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदापासून दोन पाऊल दूर
author img

By

Published : Sep 5, 2019, 3:50 PM IST

न्यूयॉर्क - स्पेनचा दिग्गज खेळाडू राफेल नदाल याने यूएस ओपन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. नदाल आपल्या करिअरमधील १९ वी ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्यापासून दोन पाऊल दूर आहे. उपांत्यपूर्व सामन्यात नदालने अर्जेंटिनाच्या डिएगो स्वार्ट्जमॅन याचा पराभव केला.

राफेल नदाल आणि जागतिक क्रमवारीत २० व्या स्थानावर असलेल्या डिएगोमध्ये उपांत्यपूर्व फेरीतील लढत २ तास ४६ मिनिटे रंगली. या लढतीत नदालने ६-४, ७-५, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.

Us Open २०१९ : सेरेना विल्यम्स नाबाद @१००

नदालने या विजयाबरोबर आठव्यांदा यूएस ओपन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. त्याचा उपांत्य सामना इटलीच्या माटेओ बेरेटिनी याच्याशी होणार आहे. माटेओ याने पहिल्यांदाच ग्रँडस्लॅममध्ये उपांत्य फेरी गाठली आहे.

Us Open २०१९ : व्हीनस विल्यम्सचा पराभव, सेरेनाची घोडदौड सुरू

सामन्यात पहिला सेट नदालने आरामात जिंकला त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये डिएगो याने नदालला चांगली झुंज दिली. यामुळे हा सेट अटीतटीचा ठरला. मात्र, यातही नदालने ७-५ अशी बाजी मारली. शेवटचा सेटही नदालने एकतर्फी ६-२ ने जिंकत थाटात उपांत्य फेरी गाठली.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.