मेलबर्न - सार्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोव्हिच याने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत संघर्षपूर्ण विजय मिळवत तिसरी फेरी गाठली आहे. दुसऱ्या फेरीत जोकोव्हिचला अमेरिकेच्या फ्रान्सेस टियाफोए याने झुंजवले.
जोकोव्हिच फ्रान्सेस यांच्यातील सामना तीन तास ३० मिनिटे रंगला. यात पहिल्या सेटमध्ये जोकोव्हिचने ६-३ अशी बाजी मारली. तर फ्रान्सेस याने पुढील सेट ७-६ अशा फरकाने जिंकला. त्यानंतर तिसरा सेट रोमांचक ठरला. यात जोकोव्हिचने ७-६ अशी बाजी मारली. चौथ्या सेटमध्ये जोकोव्हिचने अनुभव पणाला लावत हा सेट ६-३ असा जिंकत फ्रान्सेस याचे आव्हान मोडीत काढले.
जोकोव्हिचने हा सामना ६-३, ६-७, ७-६, ६-३ अशा फरकाने जिंकला. दुसरीकडे जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या डिएगो श्वार्ट्जमॅन याने फ्रेंचमॅन अलेक्झांडर मुलर याचा पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेची तिसरी फेरी गाठली. श्वार्ट्जमॅनने मुलर याचा १ तास ३२ मिनिटे रंगलेल्या सामन्यात ६-२, ६-०, ६-३ अशा फरकाने पराभूत केले.
यूएस ओपन विजेता थीम तिसऱ्या फेरीत...
यूएस ओपन विजेता डॅमिनिक थीमने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेची तिसरी फेरी गाठली आहे. दुसऱ्या फेरीत त्याने जर्मनच्या डॉमिनिक कोएफर याचा १ तास ३९ मिनिटे रंगलेल्या सामन्यात ६-४, ६-०, ६-२ असा धुव्वा उडवला.
हेही वाचा - Australian Open : अर्जेंटिनाच्या डिएगोने गाठली तिसरी फेरी
हेही वाचा - ऑस्ट्रेलियन ओपन : रोहन बोपण्णा आणि बेन मॅकलॅचलनचा पराभव