न्यूयॉर्क - सर्बियाचा टेनिसस्टार नोव्हाक जोकोविचने शनिवारी मिलोस राओनिकचा पराभव करून वेस्टर्न आणि सदर्न टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. जोकोविचने राओनिकचा १-६, ६-३, ६-४ असा पराभव केला. यापूर्वी जोकोविचने २०१८मध्ये प्रथमच ही स्पर्धा जिंकली होती. त्यावेळी जोकोविचने अंतिम सामन्यात रॉजर फेडररचा पराभव केला होता.
-
The moment @DjokerNole claimed his SECOND Career Golden Masters 👏
— Tennis TV (@TennisTV) August 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Djokovic defeats Raonic for the @CincyTennis 🏆, 1-6 6-3 6-4. #CInCyTENNIS pic.twitter.com/WKDSUoVEFc
">The moment @DjokerNole claimed his SECOND Career Golden Masters 👏
— Tennis TV (@TennisTV) August 29, 2020
Djokovic defeats Raonic for the @CincyTennis 🏆, 1-6 6-3 6-4. #CInCyTENNIS pic.twitter.com/WKDSUoVEFcThe moment @DjokerNole claimed his SECOND Career Golden Masters 👏
— Tennis TV (@TennisTV) August 29, 2020
Djokovic defeats Raonic for the @CincyTennis 🏆, 1-6 6-3 6-4. #CInCyTENNIS pic.twitter.com/WKDSUoVEFc
जोकोविचने राओनिकविरूद्ध विजयी विक्रम कायम ठेवला. या दोघांमधील सर्व ११ सामन्यांत जोकोविचने बाजी मारली आहे. यावर्षी त्याने सर्व २३ सामने जिंकले आहेत. जोकोविचने जागतिक क्रमवारीत दुसऱया स्थानी असलेल्या राफेल नदालच्या एटीपी मास्टर्स-१००० स्पर्धेच्या विजेतेपदाच्या विक्रमाची बरोबरी केली. जोकोविच आणि नदालच्या खात्यात या प्रकारात प्रत्येकी ३५ जेतेपदे आहेत. एटीपी मास्टर्स-१००० स्पर्धेची सर्व विजेतेपदे जिंकणारा जोकोविच हा एकमेव खेळाडू आहे.
-
Lift it up! 🙌 🏆
— ATP Tour (@atptour) August 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
🎥: @CincyTennis | @DjokerNole pic.twitter.com/a9vuOlJJj5
">Lift it up! 🙌 🏆
— ATP Tour (@atptour) August 29, 2020
🎥: @CincyTennis | @DjokerNole pic.twitter.com/a9vuOlJJj5Lift it up! 🙌 🏆
— ATP Tour (@atptour) August 29, 2020
🎥: @CincyTennis | @DjokerNole pic.twitter.com/a9vuOlJJj5
यूएस ओपनमधील सलामी सामन्याच्या दोन दिवस आधी त्याने हे विजेतेपद जिंकले आहे. यूएस ओपनमधील जोकोविचचा पहिला सामना १०७व्या क्रमांकाच्या बोस्नियाचा दामीर जुमहुरशी होईल. वेस्टर्न आणि सदर्न ओपन स्पर्धा जिंकल्यानंतर जोकोविच म्हणाला, "हे माझ्यासाठी सोपे नव्हते. शेवटचे तीन-चार दिवस खूप कठीण होते. मानसिक व भावनिकदृष्ट्या स्थिर राहून विजेतेपद मिळवणे खरोखर आव्हानात्मक होते."
हे जोकोविचचे वर्षाचे चौथे एटीपी टूर विजेतेपद आहे. यावर्षी त्याने ऑस्ट्रेलियन ओपन, एटीपी कप आणि दुबई ड्यूटी फ्री टेनिस स्पर्धा जिंकली आहे.