अथेन्स - माणसांना वर्षातून एकदा लॉकडाऊनमध्ये राहावे लागेल आणि ते निसर्गासाठी चांगले असेल, असे ग्रीसचा युवा टेनिसपटू स्टीफनोस सितसिपासने म्हटले आहे. इन्स्टाग्रामवर झालेल्या लाईव्ह संभाषणात सितसिपासने ही प्रतिक्रिया दिली.
कुटुंबाला वेळ देता येत असल्याने सितसिपास खुश आहे. तो म्हणाला, ''लॉकडाऊन खूप वेगळे आहे. आम्ही थांबलो आहोत. हे खूप वेगळे वाटते कारण आपण इतर लोकांशी संपर्क साधू शकत नाही. मला खरोखर वाटते की आपण वर्षामध्ये एकदा लॉकडाऊनमध्ये राहायला हवे. ते आपल्या निसर्गासाठी आणि पृथ्वीसाठी चांगले असेल. आपल्या पर्यावरणासाठी हे नक्कीच फायदेशीर ठरेल."
सितसिपास पुढे म्हणाला, "आपल्याला आयुष्यात कुटुंबासमवेत राहण्यास आणि त्यांच्याशी संपर्क साधण्यास जास्त वेळ मिळत नाही. परंतू आता अशी संधी आपल्याला लाभली आहे."