ETV Bharat / sports

Australian Open: नदालला पराभवाचा धक्का; पाच सेटच्या थरारक सामन्यात सित्सिपासची बाजी - Stefanos Tsitsipas vs Daniil Medvedev

ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत ग्रीसच्या पाचव्या मानांकित स्टेफानोस सित्सिपासने चिवट झुंज देत पाच सेटच्या थरारक सामन्यात नदालला पराभवाचा धक्का दिला आणि उपांत्य फेरीत धडक मारली.

Australian Open: Stefanos Tsitsipas beats Rafael Nadal to set up Daniil Medvedev semi-final
Australian Open: नदालला पराभवाचा धक्का; पाच सेटच्या थरारक सामन्यात सित्सिपासची बाजी
author img

By

Published : Feb 17, 2021, 7:09 PM IST

Updated : Feb 17, 2021, 7:34 PM IST

मेलबर्न - दुसऱ्या मानांकित राफेल नदालचे ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील आव्हान आज उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. ग्रीसच्या पाचव्या मानांकित स्टेफानोस सित्सिपासने चिवट झुंज देत पाच सेटच्या थरारक सामन्यात नदालला पराभवाचा धक्का दिला आणि उपांत्य फेरीत धडक मारली.

नदाल-सित्सिपास यांच्यातील सामन्याचे हायलाइट्स

ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत एकही सेट न गमावता, उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेल्या नदालने जबरदस्त खेळ केला. त्याने पहिला आणि दुसरा सेट ६-३, ६-२ असा सहज जिंकला. नदाल तिसरा सेट जिंकून उपांत्य फेरीत धडक देणार असे वाटत असताना सित्सिापासने सामन्यात जोरदार कमबॅक केले. त्याने तिसऱ्या सेटमध्ये दिग्गज नदालला झुंजवले आणि हा सेट ७-६ अशा फरकाने जिंकला. यानंतर चौथ्या सेटमध्ये सित्सिपासने नदालचे आक्रमण मोडीत काढत हा सेट त्याने ६-४ ने जिंकला.

निर्णायक सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी जिगरबाज खेळ केला. पण यात सित्सिपासने बाजी मारली. त्याने हा सेट ७-५ अशा फरकाने जिंकत उपांत्य फेरी गाठली.

उपांत्य फेरीत स्टेफानोस सित्सिपासचा सामना रशियाच्या डेनिल मेदवेदेवशी होणार आहे. मेदवेदेवने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेची प्रथमच उपांत्य फेरी गाठली आहे. दुसरीकडे नदालचे टेनिस पुरुष एकेरीत विक्रमी २१व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाचे स्वप्न भंगले आहे.

हेही वाचा - ऑस्ट्रेलियन ओपन : २२ वर्षीय ब्रॅडीची उपांत्य फेरीत धडक

हेही वाचा - Australian Open : रूबलेवचा पराभव करत मेदवेदेवने प्रथमच गाठली उपांत्य फेरी

Last Updated : Feb 17, 2021, 7:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.