लंडन - ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये आपल्या पहिल्या ग्रँड स्लॅम एकेरीचे विजेतेपद मिळवणारी अमेरिकेची टेनिसपटू सोफिया केनिनला डब्ल्यूटीए 'प्लेयर ऑफ द इयर' म्हणून निवडण्यात आले. केनिनने उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाच्या अॅश्ले बर्टीचा पराभव केला. त्यानंतर अंतिम फेरीत तिने दोन वेळा ग्रँड स्लॅम चॅम्पियन गार्बिन मुगुरूजाला हरवले. केनिनने फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यातही प्रवेश केला होता.
हेही वाचा - 'स्विच हिट' गोलंदाजांना मारक?... गांगुलीने दिली प्रतिक्रिया
२२ वर्षीय केनिन डब्ल्यूटीए प्लेयर ऑफ द इयर विजेतेपद मिळवणारी आठवी अमेरिकन खेळाडू ठरली. यासह, तिने सेरेना विल्यम्स, मार्टिना नवरातीलोवा, लिंडसे डेव्हनपोर्ट, ट्रेसी ऑस्टिन, ख्रिस एव्हर्ट, व्हिनस विल्यम्स आणि जेनिफर एरिएटीटी यांच्या पंगतीत स्थान मिळवले.
याव्यतिरिक्त, २०२०मध्ये केनिनला पराभूत करून फ्रेंच ओपनचा किताब जिकणाऱ्या इगा स्वेतिकला डब्ल्यूटीएचा 'मोस्ट इम्प्रूव्ह प्लेअर ऑफ द इयर' पुरस्कार मिळाला.