रोम - रोमानियन टेनिसपटू पहिल्या मानांकित सिमोना हालेपने शनिवारी इटालियन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. हालेपची कझाकिस्तानची प्रतिस्पर्धी युलिया पुतिन्त्सेवाने सामन्यातून माघार घेतली. पाठीच्या दुखापतीमुळे पुतिन्त्सेवाने या सामन्यात न खेळण्याचा निर्णय घेतला.
-
.@Simona_Halep progresses to the @InteBNLdItalia semifinals as Putintseva reties at 6-2, 2-0. pic.twitter.com/ZGxojCrca9
— wta (@WTA) September 19, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">.@Simona_Halep progresses to the @InteBNLdItalia semifinals as Putintseva reties at 6-2, 2-0. pic.twitter.com/ZGxojCrca9
— wta (@WTA) September 19, 2020.@Simona_Halep progresses to the @InteBNLdItalia semifinals as Putintseva reties at 6-2, 2-0. pic.twitter.com/ZGxojCrca9
— wta (@WTA) September 19, 2020
पुतिन्त्सेवाने सामना सोडला तेव्हा हालेप ६-२, २-० अशा आघाडीवर होती. या सामन्यात पुतिन्त्सेवाने वैद्यकीय कारणांमुळे विश्रांती घेतली होती. पुतिन्त्सेवाने यूएस ओपनच्या उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. तर कोरोनामुळे हालेपने यूएस ओपनमघध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला.
आता हालेपचा सामना दोन वेळची ग्रँडस्लॅम विजेती गार्बिन मुगुरुझा आणि यूएस ओपन उपविजेती व्हिक्टोरिया अझारेंका यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.