मेलबर्न - अमेरिकेची टेनिस स्टार सेरेना विल्यम्सचे २४ व्या ग्रँडस्लॅमचे स्वप्न भंगले आहे. सेरेनाला ऑस्ट्रेलियन ओपनच्या तिसऱ्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. चीनच्या २७ व्या मानांकित वांग किआंगने सातवेळची ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन आणि आठव्या मानांकित सेरेनाला ६-४, ६-७, ७-५ असे पराभूत केले.
-
The biggest win of her career.
— 🇳🇬MYsport Nigeria🇳🇬™ (@MYsport_ng) January 24, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Qiang Wang takes down No. 8 seed Serena Williams in an EPIC 3-set battle at the #AusOpen . pic.twitter.com/BBh5IJF1O5
">The biggest win of her career.
— 🇳🇬MYsport Nigeria🇳🇬™ (@MYsport_ng) January 24, 2020
Qiang Wang takes down No. 8 seed Serena Williams in an EPIC 3-set battle at the #AusOpen . pic.twitter.com/BBh5IJF1O5The biggest win of her career.
— 🇳🇬MYsport Nigeria🇳🇬™ (@MYsport_ng) January 24, 2020
Qiang Wang takes down No. 8 seed Serena Williams in an EPIC 3-set battle at the #AusOpen . pic.twitter.com/BBh5IJF1O5
हेही वाचा - VIDEO : ...आणि अनिताची नदालने केली विचारपूस!
या स्पर्धेपूर्वी, सेरेना आणि वांग किआंग यूनाइटेड स्टेट ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत आमनेसामने आले होते. त्यावेळी सेरेनाने ६-१, ६-० असे सहज हरवले होते. या पराभवाचा बदला वांगने यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये घेतला आहे.
२८ वर्षीय वांगने सर्व्हिर्सेसच्या बळावर सेरेनाविरूद्धचा पहिला सेट आपल्या नावावर केला. या सेटनंतर, सेरेनाने दुसरा सेट जिंकला खरा. मात्र, तिने सामन्यावरील नियंत्रण गमावले.
सेरेनाची आपल्या २४ व्या ग्रँडस्लॅम एकेरीच्या विजेतेपदाची मोठी संधी हुकली आहे. तत्पूर्वी, सेरेना २००६ च्या ऑस्ट्रेलियन ओपनमधील तिसर्या फेरीतील पराभवानंतर बाहेर पडली होती.