नवी दिल्ली - टेनिसविश्वात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या सेरेना विल्यम्सने यूएस ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. तिने उपांत्य सामन्यात ५ व्या मानांकित युक्रेनच्या एलिना स्विटोलिना हिला ६-३, ६-१ असे पराभूत केले.
हेही वाचा - स्टीव स्मिथचे २६ वे शतक; विराट कोहलीला टाकले मागे
या सामन्यामध्ये ३७ वर्षीय सेरेनाने स्विटोलिना हिला वरचढ होऊ दिले नाही. या सामन्यात सेरेनाच फेवरेट मानली जात होती. तिने स्विटोलिनावर सहज विजय नोंदवला. अंतिम फेरीत तिला १५ व्या मानांकित चेक प्रजासत्ताकच्या बियांका आंद्रेस्कू हिचे आव्हान असणार आहे. कॅनडाच्या १९ वर्षीय बियांकाने उपांत्य फेरीत १३ वी मानांकित बेलिंडा बेंकिक हिला ७-६ (७-३), ७-५ असे पराभूत केले आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.
-
The women's singles final is set!
— US Open Tennis (@usopen) September 6, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Who is your pick to lift the 🏆? #USOpen pic.twitter.com/CwsoEOZhee
">The women's singles final is set!
— US Open Tennis (@usopen) September 6, 2019
Who is your pick to lift the 🏆? #USOpen pic.twitter.com/CwsoEOZheeThe women's singles final is set!
— US Open Tennis (@usopen) September 6, 2019
Who is your pick to lift the 🏆? #USOpen pic.twitter.com/CwsoEOZhee
हेही वाचा - विराटच्या 'त्या' फोटोवर लोक म्हणाले, बायकोने घराबाहेर काढल्याने झाली का ही अवस्था?
बियांकाने पहिल्यांदाच या स्पर्धेत प्रवेश घेतला आहे आणि एका ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. तर, यूएस ओपनमध्ये सेरेनाने १०व्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सेरेनाने सहा वेळा या स्पर्धेचे जेतेपद पटकावले. यासोबतच तिने यूएस ओपनच्या क्रिस एवर्टच्या सर्वाधिक विजयाच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.