ETV Bharat / sports

सानिया-मकेल जोडी क्लीवलँड चॅम्पियनशीपच्या उपांत्यपूर्व फेरीत - सानिया मिर्झा

भारताची स्टार महिला टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिची महिला अमेरिकी पार्टनर ख्रिस्टीन मकेल या जोडीने क्लीवलँड टेनिस चॅम्पियनशीप स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

Sania-Mchale enters quarterfinals at Cleveland
सानिया-मकेल जोडी क्लीवलँड चॅम्पियनशीपच्या उपांत्यपूर्व फेरीत
author img

By

Published : Aug 23, 2021, 3:30 PM IST

क्लीवलँड - भारताची स्टार महिला टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिची महिला अमेरिकी पार्टनर ख्रिस्टीन मकेल या जोडीने क्लीवलँड टेनिस चॅम्पियनशीप स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. सानिया-मकेल जोडीने सरळ सेटमध्ये विजय मिळवला.

सनिया मिर्झा आणि ख्रिस्टीन मकेल या जोडीने रविवारी रात्री झालेल्या महिला दुहेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जॉर्जियाच्या ओकसाना कलाशिनिकोवा आणि रोमानियाच्या आंद्रिया मीट या जोडीचा धुव्वा उडवला. सानिया-मकेल जोडीने हा सामना 6-3, 6-2 अशा सरळ सेटमध्ये जिंकला.

महिला दुहेरीच्या उपउपांत्यपूर्व सामन्यात सानिया मिर्झा आणि ख्रिस्टीन मकेल या जोडीने संपूर्ण वर्चस्व मिळवले. सामन्याच्या पहिल्या गेमपासून त्यांनी जोरदार खेळ केला. या जोडीने प्रतिस्पर्धी खेळाडूंना सामन्यात पुनरागमनाची संधीच दिली नाही. पहिला सेट 6-3 असा सहज जिंकला. त्यानंतर हीच लय कायम राखत त्यांनी दुसरा सेट 6-2 ने जिंकत सामना आपल्या नावे केला.

हेही वाचा - Tokyo Olympics : नोवाक जोकोव्हिचचा संताप; रागाच्या भरात तोडलं रॅकेट, पाहा व्हिडिओ

हेही वाचा - विम्बल्डनमध्ये एका महिलेवर फोकस झाला कॅमेरा, प्रेक्षकांनी उभे राहून केला टाळ्याचा कडकडाट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.