नवी दिल्ली - सध्या सुरु असलेल्या अमेरिका ओपन स्पर्धेत भारतासाठी एका डोळ्यात 'हसू' तर एका डोळ्यात 'आसू' असा दिवस पाहायला मिळाला. या स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत रोहन बोपण्णाने डेनिस शापोवालोवच्या साथीने दुसरी फेरी गाठली. तर, लिएंडर पेस आणि गुलीरेमो दुरान या जोडीला पहिल्या फेरीतच गारद व्हावे लागले.
-
6⃣-3⃣,
— Tennis Canada (@TennisCanada) August 30, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
6⃣-1⃣.@denis_shapo/@rohanbopanna win against Herbert/Mahut [4] to reach the second round of the #USOpen. pic.twitter.com/RoqEMFfQPF
">6⃣-3⃣,
— Tennis Canada (@TennisCanada) August 30, 2019
6⃣-1⃣.@denis_shapo/@rohanbopanna win against Herbert/Mahut [4] to reach the second round of the #USOpen. pic.twitter.com/RoqEMFfQPF6⃣-3⃣,
— Tennis Canada (@TennisCanada) August 30, 2019
6⃣-1⃣.@denis_shapo/@rohanbopanna win against Herbert/Mahut [4] to reach the second round of the #USOpen. pic.twitter.com/RoqEMFfQPF
कॅनडाचा डेनिस शापोवालोव आणि रोहन बोपण्णाने फ्रान्सच्या माहूत आणि पियरे ह्यूजेस हर्बर्ट या जोडीला ६-३, ६-१ असे हरवले. हा सामना ५५ मिनिटांपर्यंत रंगला होता. शापोवालोव आणि बोपण्णाने दोन वेळा सर्व्हिस गमावली. मात्र, त्यांनी सातपैकी सहा वेळा प्रतिस्पर्धी जोडीची सर्व्हिस ब्रेक केली.
पाहा फोटोगॅलरी - स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने 'गोरे' होण्यासाठी केली नवी युक्ती
दुसरीकडे, लिएंडर पेस आणि अर्जेंटिनाच्या गुलीरेमो दुरान यांना सर्बियाच्या मिमोमीर आणि नॉर्वेच्या कॅस्पर रुडकडून ५-७, २-६ असा पराभव स्वीकारावला लागला. दिविज शरण आणि हुगो नीस यांना आधीच स्पर्धेबाहेर पडावे लागले आहे.