मियामी - स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररने मियामी ओपन टेनिस स्पर्धेत आपली विजयी घौडदौड कायम राखली आहे. स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपात्यं फेरीत ३७ वर्षीय फेडररने कॅनडाच्या १९ वर्षीय डेनिस शापोव्हालोव्हला पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली आहे.
२० ग्रँडस्लॅम विजेता असलेल्या फेडररने नवख्या शापोव्हालोव्हवर ६-२, ६-४ ने मात करत पांचव्यांदा या स्पर्धेतील अंतिम फेरी गाठली आहे. आता विजेतेपदासाठी अंतिम फेरीत फेडररचा सामना अमेरिकेच्या जॉन इस्नेरशी होणार आहे.
![roger federer](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/sachin_sports_2_3003newsroom_00361_172.jpg)
फेडररने आजवर ३ वेळा मियामी ओपनचा किताब आपल्या नावावर केला आहे. २०१७ मध्ये अखेरच्या वेळी फेडररनेया स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते.