नूर सुलतान (कझाकिस्तान) - रामकुमार रामनाथन आणि सुमित नागलने डेव्हिस चषक स्पर्धेत आशिया- ओसनिया ग्रुपच्या पहिल्या फेरीमध्ये पाकिस्तानला पिछाडीवर टाकले आहे. भारताने पाकिस्तानला पछाडत २-० ने आघाडी घेतली.
-
#RamkumarRamanathan and #SumitNagal toyed with #Pakistan as #India raced to a 2-0 lead in their #DavisCup tie on Friday.
— IANS Tweets (@ians_india) November 29, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Photo: IANS pic.twitter.com/aJETaGZ3Iu
">#RamkumarRamanathan and #SumitNagal toyed with #Pakistan as #India raced to a 2-0 lead in their #DavisCup tie on Friday.
— IANS Tweets (@ians_india) November 29, 2019
Photo: IANS pic.twitter.com/aJETaGZ3Iu#RamkumarRamanathan and #SumitNagal toyed with #Pakistan as #India raced to a 2-0 lead in their #DavisCup tie on Friday.
— IANS Tweets (@ians_india) November 29, 2019
Photo: IANS pic.twitter.com/aJETaGZ3Iu
हेही वाचा - कडक!..श्रेयस अय्यरने लगावलेला 'हेलिकॉप्टर शॉट' पाहिलात का?
रामकुमारने ४२ मिनिटे रंगलेल्या या सामन्यामध्ये १७ वर्षीय मोहम्मद शोएबला ६-०, ६-० ने मात दिली. तर, सुमितने हुफैजा मोहम्मद रहमानला ६-०, ६-२ ने मात देत भारताला आघाडी मिळवून दिली आहे. येत्या शनिवारी भारताचा अनुभवी टेनिसपटू लिएंडर पेस आणि जीवन नेदुनचेझियान यांचा सामना हुफैज आणि शोएब यांच्याशी होणार आहे.
ही स्पर्धा भारताने पाकिस्तानबाहेर खेळवण्याची मागणी केली होती. या मागणीमुळे पाकिस्तानचे महत्वाचे आणि दिग्गज खेळाडु या सामन्यामध्ये सहभागी झाले नाहीत. हा सामना सप्टेंबर महिन्यात इस्लामाबाद येथे होणार होता. मात्र, दोन्ही देशांतील तणावाचे संबंध पाहता भारताने स्पर्धेचं ठिकाण बदलण्याची मागणी केली होती.
या सामन्यातील विजेता संघ विश्व ग्रुप पात्रता स्पर्धेसाठी क्रोएशिया येथे जाणार आहे. ६ ते ७ मार्च दरम्यान हा सामना खेळला जाईल.