पॅरिस - स्पेनचा महान टेनिसपटू राफेल नदालने फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. नदालने इटलीच्या जेनिक सिनरला हरवले. मंगळवारी आपला १००वा सामना खेळणार्या नदालने २९ वर्षीय सिनरला ७-६, (४), ६-४, ६-१ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले.
-
Simply Stunning 👏
— Roland-Garros (@rolandgarros) October 6, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
In his 100th career match at #RolandGarros, @RafaelNadal returns to a 13th SFs defeating Sinner 7-6(4), 6-4, 6-1. pic.twitter.com/7OzxSouBIG
">Simply Stunning 👏
— Roland-Garros (@rolandgarros) October 6, 2020
In his 100th career match at #RolandGarros, @RafaelNadal returns to a 13th SFs defeating Sinner 7-6(4), 6-4, 6-1. pic.twitter.com/7OzxSouBIGSimply Stunning 👏
— Roland-Garros (@rolandgarros) October 6, 2020
In his 100th career match at #RolandGarros, @RafaelNadal returns to a 13th SFs defeating Sinner 7-6(4), 6-4, 6-1. pic.twitter.com/7OzxSouBIG
सामन्यानंतर नदाल म्हणाला, "सिनर एक अतिशय प्रतिभावान तरुण खेळाडू आहे. त्याच्याकडे उत्तम फटके आहेत. पहिले दोन सामने खडतर होते. पहिल्या सेटनंतर मी खूप भाग्यवान ठरलो. तिसर्या सेटमध्ये माझी सुधारणा झाली. आक्रमक खेळणे माझ्यासाठी चांगले आहे. रोलंड गॅरोस येथे उपांत्य फेरीत प्रवेश केल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे.''
पुढच्या फेरीत नदालचा सामना दिएगो श्वार्ट्झमनशी होईल. डॉमिनिक थीमला दिएगो श्वार्ट्झमनने पराभूत केले आहे. श्वार्ट्झमनने पाच तासाच्या सामन्यात थीमला ७-६ (७-१), ५-७, ६-७(६-८), ७-६ (७-५), ६-२ असे पराभूत केले. माझ्या कारकिर्दीतील हा पहिला पाच तासांचा सामना होता, असे सामना संपल्यानंतर थीमने सांगितले.