ETV Bharat / sports

क्विटोवा आणि प्लिस्कोवा प्रागमधील टेनिस स्पर्धेत खेळणार

author img

By

Published : May 12, 2020, 12:00 PM IST

“खेळाडूंना बाहेर प्रवास करण्यास मनाई असताना चेक टेनिस संघाने (सीटीएस) ही आयोजित केलेली ही स्पर्धा आहे,” असे स्पर्धेचे प्रवक्ते कारेल तेजकल यांनी म्हटले आहे. क्विटोवा आणि प्लिस्कोवा बहिणींव्यतिरिक्त देशातील अव्वल 100 टेनिसपटू या स्पर्धेत भाग घेतील.

petra kvitova and karolina pliskova will participate in prague tournament
क्विटोवा आणि प्लिस्कोवा प्रागमधील टेनिस स्पर्धेत खेळणार

नवी दिल्ली - प्राग येथे होणाऱ्या टेनिस स्पर्धेत माजी अव्वल महिला खेळाडू पेट्रा क्विटोवा आणि सध्याच्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेली कॅरोलिना प्लिस्कोवा भाग घेणार आहेत. स्पर्धेच्या आयोजकांनी याबाबत माहिती दिली. 26 ते 28 मे या कालावधीत चेक प्रजासत्ताकच्या राजधानीत ही स्पर्धा खेळली जाईल. ज्यामध्ये फक्त देशातील महिला व पुरुष टेनिसपटू सहभागी होतील.

“खेळाडूंना बाहेर प्रवास करण्यास मनाई असताना चेक टेनिस संघाने (सीटीएस) ही आयोजित केलेली ही स्पर्धा आहे,” असे स्पर्धेचे प्रवक्ते कारेल तेजकल यांनी म्हटले आहे. क्विटोवा आणि प्लिस्कोवा बहिणींव्यतिरिक्त देशातील अव्वल 100 टेनिसपटू या स्पर्धेत भाग घेतील.

पुरुषांच्या बाबतीत सांगायचे झाले तर जगातील 65 व्या क्रमांकावर असलेला जिरी वेस्ले यामध्ये भाग घेणार आहे. मार्चमध्ये टेनिस हंगाम स्थगित झाल्यानंतर, पुन्हा टेनिस रुळावर आणण्याचा हा प्रयत्न आहे. फ्रेंच ओपन स्पर्धाही कोरोनामुळे सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली गेली. तर, विम्बल्डनही रद्द करण्यात आले आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.