मेलबर्न - जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा टेनिसपटू असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये आपली चमकदार कामगिरी सुरू ठेवली आहे. अव्वल मानांकित जोकोविचने कॅनडाच्या मिलोस राओनिकचा पराभव करून पुरुष एकेरीच्या पूर्व उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश नोंदवला. दोन तास ५६ मिनिटे चाललेल्या या सामन्यात जोकोविचने १४ व्या मानांकित राओनिकचा ७-६(४), ४-६, ६-१, ६-४ असा पराभव केला.
हेही वाचा - भारतीय भूमीवर सिराजचा पराक्रम, ८९ वर्षानंतर नोंदवली भन्नाट कामगिरी
३३ वर्षीय जोकोविचचा ग्रँडस्लॅम स्पर्धेतील हा ३००वा विजय ठरला. आठवेळा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकलेल्या जोकोविचने या विजयासह अकराव्यांदा स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. या फेरीत तो सहाव्या मानांकित जर्मनीच्या अलेक्झांडर ज्वेरेवसमोर उभा ठाकेल.
ज्वेरेवने यापूर्वीच्या सामन्यात २३व्या मानांकित सर्बियाच्या दुसन लाजोविकचा ६-४, ७-६(५), ६-३ असा पराभव केला.
मेदवेदेव उपांत्यपूर्व फेरीत
जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकाचा खेळाडू रशियाच्या डॅनिल मेदवेदेवने अमेरिकेच्या मॅकेन्झी मॅकडोनल्डचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत त्याचा सामना आंद्रे रुबलेवशी होईल. मेदवेदेवने 25 वर्षीय मॅक्डोनाल्डचा ६-४. ६-२, ६-३ असा पराभव केला. मेदवेदेवने तिसऱ्यांदा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.