ETV Bharat / sports

व्हिएन्ना ओपन २०२० : जोकोविचला पराभवाचा धक्का, इटलीच्या सॉन्गोने दिली मात - जोकोव्हिचचा व्हिएन्ना ओपनमधून बाहेर न्यूज

जगातील अव्वल क्रमांकाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविचला व्हिएन्ना ओपन स्पर्धेत पराभवाचा धक्का बसला. स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत इटलीच्या जागतिक नामांकित ४२ क्रमांकावर असलेल्या लोरेन्झो सॉन्गोने जोकोविच २-६,१-६ असा पराभव केला.

novak djokovic out of vienna open defeated by lorenzo in quarter finals
व्हिएन्ना ओपन २०२० : जोकोव्हिचला पराभवाचा धक्का, इटलीच्या सॉन्गोने दिली मात
author img

By

Published : Nov 1, 2020, 6:37 PM IST

व्हिएन्ना - जगातील अव्वल क्रमांकाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविचला व्हिएन्ना ओपन स्पर्धेत पराभवाचा धक्का बसला. स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत इटलीच्या जागतिक नामांकित ४२ क्रमांकावर असलेल्या लोरेन्झो सॉन्गोने जोकोविचचा २-६,१-६ असा पराभव केला.

जागतिक नामांकित पहिल्या दहा खेळाडूंना पराभूत करण्याची लोरेन्झो सॉन्गो पहिलीच वेळ आहे. दरम्यान, या पराभवाने जोकोविचचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. त्याचा हा वर्षातील तिसरा पराभव ठरला.

जोकोविचने २००७ मध्ये व्हिएन्ना ओपन स्पर्धेचे विजेतेपद जिंकले होते. त्यानंतर तो प्रथमच या स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता. शिवाय डोमिनिक थिमने आंद्रे रुबलेव्हचा ६-७, २-६ असा पराभव केला आहे. जोकोविच पुढील आठवड्यात होणाऱ्या पॅरिस मास्टर्समध्ये सहभागी होणार नाही.

हेही वाचा - फ्रेंच ओपनचे जेतेपद गमावल्यानंतरही जोकोविच अव्वलस्थानी कायम

हेही वाचा - विम्बल्डन विजेती सिमोना हालेपला कोरोनाची लागण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.