नवी दिल्ली - यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावलेल्या नोव्हाक जोकोविचने एटीपी क्रमवारीत पहिले स्थान मिळवले आहे. सर्बियाच्या जोकोविचने स्पेनच्या राफेल नदालला मागे टाकत ही क्रमवारी मिळवली.
हेही वाचा - IND vs NZ : कसोटीत रोहितची जागा 'हा' खेळाडू घेणार, बीसीसीआयची पृष्टी
जवळपास चार तास चाललेल्या पाच सेटच्या अंतिम सामन्यात जोकोविचने ऑस्ट्रियाच्या पाचव्या मानांकित डोमिनिक थीमचा ६-४, ४-६, २-६, ६-३, ६-४ असा पराभव केला.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये नदालने जोकोविचला पराभूत करून प्रथम स्थान मिळवले होते. या नव्या क्रमवारीत थीमनेही प्रगती केली असून तो चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. तर, रशियाचा डॅनिल मेदवदेवची पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे.
याशिवाय डब्ल्यूटीए महिला क्रमवारीमध्ये ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला एकेरीची विजेती सोफिया केनिनने डब्ल्यूटीए रॅकिंगमध्ये मोठी कामगिरी केली आहे. सोफियाने ७ वे स्थान राखले आहे. एश्लेग बार्टीचा पराभव करत २१ वर्षीय सोफियाने ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली आहे.