ETV Bharat / sports

एटीपी क्रमवारी : नोव्हाक जोकोविचचा नवा विक्रम - djokovic atp rankings record

१७ ग्रँडस्लॅम विजेता जोकोविचने आपल्या कारकिर्दीत पाचव्यांदा अव्वल स्थान गाठले आहे. तो ३ फेब्रुवारी २०२०पासून अव्वल स्थानावर आहे.

novak djokovic completes 286th weeks as number one position in the atp rankings
एटीपी क्रमवारी : नोव्हाक जोकोविचचा नवा विक्रम
author img

By

Published : Sep 22, 2020, 4:56 PM IST

रोम - सर्बियाचा टेनिस स्टार नोव्हाक जोकोविचने एटीपी क्रमवारीत प्रथम क्रमांकाचा खेळाडू म्हणून २८७व्या आठवड्याला सुरुवात केली आहे. जोकोविचने पीट सॅम्प्रसच्या २८६ आठवड्यांचा विक्रम मोडित काढला. सर्वाधिक आठवडे प्रथम क्रमांकावर असणार्‍या खेळाडूंच्या यादीत जोकोविच आता दुसर्‍या क्रमांकावर पोहोचला आहे.

सॅम्प्रस आपल्या कारकिर्दीत १२ एप्रिल १९९३रोजी प्रथम क्रमांकाचा खेळाडू ठरला. त्याने आपल्या कारकीर्दीत एकूण ११ वेळा अव्वल स्थान मिळवले. सोमवारी जोकोविचने इटालियन ओपन पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकले. त्याने अर्जेटिनाच्या दिएगो श्वार्ट्झमनला सरळ सेटमध्ये पराभूत केले. जोकोविचने श्वार्ट्झमनचा ७-५, ६-३ असा पराभव करून आपले ३६वे मास्टर्स जेतेपद जिंकले. या विक्रमात जोकोविच नदालपेक्षा एका विजेतेपदाने पुढे आहे.

"पीट लहानपणापासूनच माझा नायक आहे आणि म्हणूनच त्याचा विक्रम मागे टाकणे माझ्यासाठी खूप विशेष आहे", असे जोकोविचने सांगितले. १७ ग्रँडस्लॅम विजेता जोकोविचने आपल्या कारकिर्दीत पाचव्यांदा अव्वल स्थान गाठले आहे. तो ३ फेब्रुवारी २०२०पासून अव्वल स्थानावर आहे. स्वित्झर्लंचा रॉजर फेडरर या विक्रमात सरस असून त्याने ३१० आठवड्यांपर्यंत आपले अव्वल स्थान राखले होते. हा विक्रमापासून जोकोविच अजून २४ आठवडे दूर आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.