हैदराबाद - स्पेनचा माजी नंबर वन खेळाडू आणि क्ले कोर्टचा बादशहा राफेल नदालला घरच्याच मैदानावर सुरू असलेल्या बार्सिलोना ओपनमधून बाहेर पडावे लागले. नदालला ५ व्या मानांकित ऑस्ट्रेलियाच्या डोमॅनिक थिमकडून ६-४, ६-४ अशा सरळ सेटमध्ये पराभव पत्करावा लागला. डोमॅनिक थीमचा अंतिम सामना १४ व्या मानांकित रशियाच्या डॅनियल मेदवेदवशी होणार आहे.
डॅनियल मेदवेदेने उपांत्य फेरीत जपानच्या केई निशीकोरीच ६-४, ३-६, ७-५ अशा सेटमध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. मेदवेदवने पहिला सेट जिंकल्यानंतर निशकोरीने पुनरागमन करत दुसरा सेट ३-६ ने जिंकत सामना बरोबरीत आणला. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये मेदवेदेवने निशीकोरीचे सर्व्हिस भेदत तिसरा सेट ७-५ ने जिंकत सामना जिंकला. राफेल नदालचा झालेला पराभव हा धक्कादायक आहे. क्ले कोर्टचा बादशहाच्या पराभवामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. नदाल दुखापतीने नेहमी त्रस्त केले आहे. त्यामुळे त्याला सतत सामने खेळण्यास अडचण येत आहे. मागील मालिकेत त्याने उपांत्य फेरीतून माघार घेतली होती. पुढच्या महिन्यातच विम्बल्डन आणि फ्रेंच ओपनच्या स्पर्धा होणार आहेत.