ETV Bharat / sports

राफेल नदालची अकादमी करणार टेनिस स्पर्धेचे आयोजन - नदालची अकादमी टेनिस स्पर्धेचे आयोजन करणार न्यूज

नदालच्या अकादमीने एका निवेदनात म्हटले आहे, की टेनिस सध्या स्थगित आहे. सद्यपरिस्थितीत सर्वांचे आरोग्य सर्वात महत्वाचे आहे. परंतु येत्या काही महिन्यांत या अकादमीचा उपयोग अन्य व्यावसायिक खेळाडूंना मदत करण्यासाठी करता येत असेल तर त्यांना प्रशिक्षण देण्यात आनंद होईल. या अकादमीच्या माध्यमातून स्पर्धाही घेण्यात येऊ शकतात.

Nadal Academy plans to host tournament
राफेल नदालची अकादमी करणार टेनिस स्पर्धेचे आयोजन
author img

By

Published : Apr 20, 2020, 4:56 PM IST

माद्रिद - स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदालची मालोर्कास्थित अकादमीने डब्ल्यूटीए आणि एटीपी सर्किटमधील व्यावसायिक खेळाडूंपर्यंत पोहोचण्याचा विचार केला आहे. टॉप-50 आणि टॉप-100 रँकिंगच्या बाहेरील खेळाडूंनी सध्या स्पर्धा स्थगित असल्यामुळे कारकीर्दीवर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली आहे.

नदालच्या अकादमीने एका निवेदनात म्हटले आहे, की टेनिस सध्या स्थगित आहे. सद्यपरिस्थितीत सर्वांचे आरोग्य सर्वात महत्वाचे आहे. परंतु येत्या काही महिन्यांत या अकादमीचा उपयोग अन्य व्यावसायिक खेळाडूंना मदत करण्यासाठी करता येत असेल तर त्यांना प्रशिक्षण देण्यात आनंद होईल. या अकादमीच्या माध्यमातून स्पर्धाही घेण्यात येऊ शकतात.

कोरोना व्हायरसने सध्या जगभरात हाहाकार माजवला असून क्रीडाविश्वातील अनेक स्पर्धा स्थगित झाल्या आहे. यंदा होणारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धाही एका वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.