मेलबर्न - भारताचा स्टार टेनिसपटू लिअँडर पेसने लॅटव्हियाच्या येलेना ओस्टापेन्कोसह ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये विजयासह सुरुवात केली. त्यांनी मिश्र दुहेरीच्या पहिल्या फेरीत स्टॉर्म सँडर्स आणि मार्टा पोलमन्स या जोडीला पराभूत केले. ऑस्ट्रेलियाच्या सँडर्स आणि पोलमन यांच्या जोडीला वाइल्डकार्ड प्रवेश मिळाला होता. १ तास २७ मिनिटे चाललेल्या या सामन्यात पेस-ओस्टापेन्कोच्या त्यांना ६-७ (४) ६-३, १०-६ असे पराभूत करत दुसऱया फेरीत प्रवेश केला.
-
.@Leander makes 🇮🇳proud again. 🙌
— Sony Sports (@SonySportsIndia) January 26, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Starts his farewell year with a win at #AO2020. 🎾
Catch him in action LIVE in Round 2 only on SONY SIX & SONY TEN 2. 📺#AusOpen #AOonSONY #LeanderPaes #SonySports #RepublicDay #HappyRepublicDay2020 pic.twitter.com/6Wp4c4WTjI
">.@Leander makes 🇮🇳proud again. 🙌
— Sony Sports (@SonySportsIndia) January 26, 2020
Starts his farewell year with a win at #AO2020. 🎾
Catch him in action LIVE in Round 2 only on SONY SIX & SONY TEN 2. 📺#AusOpen #AOonSONY #LeanderPaes #SonySports #RepublicDay #HappyRepublicDay2020 pic.twitter.com/6Wp4c4WTjI.@Leander makes 🇮🇳proud again. 🙌
— Sony Sports (@SonySportsIndia) January 26, 2020
Starts his farewell year with a win at #AO2020. 🎾
Catch him in action LIVE in Round 2 only on SONY SIX & SONY TEN 2. 📺#AusOpen #AOonSONY #LeanderPaes #SonySports #RepublicDay #HappyRepublicDay2020 pic.twitter.com/6Wp4c4WTjI
हेही वाचा - दिग्गज बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंटसह त्याच्या मुलीचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू
दुसरीकडे रोहन बोपन्ना उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यशस्वी ठरला. त्याने युक्रेनच्या नादिया किचनोकसोबत खेळताना अमेरिकेच्या निकोल मेलिचर आणि ब्राझीलच्या ब्रुनो सोरेस या जोडीला ६-४, ७-६ असे पराभूत केले.
पेसने यावर्षी व्यावसायिक टेनिसमधून निवृत्त होणार आहे. पेस-ओस्टापेन्को दुसऱ्या फेरीत अमेरिकन जोडी बेथनी मॅटेक सँड्स आणि ब्रिटन जेमी मरे यांच्याशी खेळतील.