वॉशिंग्टन - माजी अव्वल आणि चार वेळा ग्रँड स्लॅम विजेती महिला टेनिसपटू किम क्लाइस्टर्सला बीएनपी परिबास ओपनमध्ये वाइल्ड कार्ड प्रवेश मिळाला आहे. मागील वर्षी निवृत्तीनंतर टेनिसमध्ये परतलेली किम तिसरी स्पर्धा खेळणार आहे. २००३ आणि २००५ मध्ये तिने ही स्पर्धा जिंकली होती. यंदा ही स्पर्धा ९ मार्चपासून सुरू होईल.
हेही वाचा - लंकेच्या पत्रकाराची विराटवर टीका
तब्बल आठ वर्षांच्या विश्रांतीनंतर प्रथमच टेनिस कोर्टवर धडक मारणार्या महिला टेनिसपटू किम क्लाइस्टर्सला दुबई ओपनच्या पहिल्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. स्पेनच्या गार्बिन मुगुरूझाने बेल्जियमच्या किमला ६-२, ७-६ असे नमवले.
२००७ मध्ये गरोदर असताना तिने निवृत्ती घेतली होती. मात्र दोन वर्षांनी पुनरागमन करत तिने २०१० मध्ये यूएस ओपनला गवसणी घातली. त्यानंतर २०११ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन पटकावल्यानंतर तिने परत एकदा निवृत्ती घेतली होती.