नवी दिल्ली - टेनिस विश्वातील अव्वल महिला खेळाडू जिने याआधी दोनवेळा निवृत्ती स्विकारली होती ती टेनिस स्टार किम क्लाइस्टर्सने मैदानात परतण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी वर्षात मार्चमध्ये होणाऱ्या मेक्सिन ओपनमधून ती टेनिस कोर्टात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. जानेवारी महिन्यात होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये भाग घेण्यास क्लाइस्टर्स इच्छुक होती मात्र, गुडघ्याच्या दुखापतीमुळे तिला जास्त काळ थांबावे लागणार आहे.
-
Kim Clijsters confirmed on Monday that she was coming out of retirement again, starting in Mexico in March. She won the Australian Open in 2011 during her first comeback https://t.co/m674Y0OHkv#wta #tennis pic.twitter.com/ZOfmmQmX0d
— AFP Sport (@AFP_Sport) December 23, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Kim Clijsters confirmed on Monday that she was coming out of retirement again, starting in Mexico in March. She won the Australian Open in 2011 during her first comeback https://t.co/m674Y0OHkv#wta #tennis pic.twitter.com/ZOfmmQmX0d
— AFP Sport (@AFP_Sport) December 23, 2019Kim Clijsters confirmed on Monday that she was coming out of retirement again, starting in Mexico in March. She won the Australian Open in 2011 during her first comeback https://t.co/m674Y0OHkv#wta #tennis pic.twitter.com/ZOfmmQmX0d
— AFP Sport (@AFP_Sport) December 23, 2019
हेही वाचा - दुखापतग्रस्त वॉर्नर 'Boxing Day Test' खेळणार की नाही, जाणून घ्या
'मी अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही, पण येत्या काही आठवड्यांत मी पूर्णपणे तंदुरुस्त होईन. मी गेल्या काही काळापासून टेनिसपासून दूर आहे', असे तीन मुलांची आई असलेल्या क्लाइस्टर्सने सांगितले आहे. २००३ मध्ये किमने जागतिक क्रमवारीत पहिले स्थान पटकावले होते. तर, २००५ मध्ये तिने आपले पहिले-वहिले ग्रँडस्लॅम जिंकले होते.
'मला काहीही सिद्ध करायचे नाही. पण, एक आव्हान म्हणून मी मैदानात उतरणार आहे', असे किमने म्हटले होते. २००७ मध्ये गरोदर असताना तिने निवृत्ती घेतली होती. मात्र दोन वर्षांनी पुनरागमन करत तिने २०१० मध्ये यूअस ओपनला गवसणी घातली होती. २०११ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन पटकावल्यानंतर तिने परत एकदा निवृत्ती घेतली होती. त्यामुळे मैदानावर परतलेली किम काय जादू करते याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.