रोम - स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदालने जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचचा पराभव करत इटालियन ओपन स्पर्धेच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. दोन तास ४९ मिनिटे रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात नदालने जोकोव्हिचचा ७-५, १-६, ६-३ अशा फरकाने पराभव केला.
-
TEN IN ROME
— Tennis TV (@TennisTV) May 16, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The moment @RafaelNadal overcame Djokovic to win an extraordinary 10th Rome title!#IBI21 pic.twitter.com/IldBAYvVKS
">TEN IN ROME
— Tennis TV (@TennisTV) May 16, 2021
The moment @RafaelNadal overcame Djokovic to win an extraordinary 10th Rome title!#IBI21 pic.twitter.com/IldBAYvVKSTEN IN ROME
— Tennis TV (@TennisTV) May 16, 2021
The moment @RafaelNadal overcame Djokovic to win an extraordinary 10th Rome title!#IBI21 pic.twitter.com/IldBAYvVKS
इटालियन ओपन स्पर्धेचा अंतिम सामना टेनिस जगतातील दोन कट्टर प्रतिस्पर्धींमध्ये झाला. नदाल आणि जोकोव्हिच यांच्यातील सामना टेनिसप्रेमींसाठी नेहमी एक पर्वणी असतो. चाहत्यांच्या इच्छेप्रमाणे सामना देखील रोमांचक झाला. यात नदालने जोकोव्हिचवर सरसी साधली. विशेष म्हणजे, एक नव्हे, दोन नव्हे तर सहाव्यांदा या दोघांमध्ये इटालियन ओपनचा अंतिम सामना खेळला गेला.
नदालने इटालियन स्पर्धेची १२व्यांदा वेळी अंतिम फेरी गाठली होती आणि त्याने १०व्यांदा जेतेपदावर नाव कोरले. या विजयासोबत नदालने जोकोविचच्या ३६ एटीपी मास्टर्स १००० विजेतेपदाशी बरोबरी साधली.
-
How did you do THAT?
— Rafa Nadal Academy by Movistar (@rnadalacademy) May 16, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
🤯 @RafaelNadal 🔥 pic.twitter.com/BRYdo8g2GZ
">How did you do THAT?
— Rafa Nadal Academy by Movistar (@rnadalacademy) May 16, 2021
🤯 @RafaelNadal 🔥 pic.twitter.com/BRYdo8g2GZHow did you do THAT?
— Rafa Nadal Academy by Movistar (@rnadalacademy) May 16, 2021
🤯 @RafaelNadal 🔥 pic.twitter.com/BRYdo8g2GZ
पहिला सेटमध्ये दोघांनी जिगरबाज खेळ केला. दोघांनी कडवी झुंज दिली. हा सेट ट्रायब्रेकरमध्ये गेला आणि नदालने यात ७-५ अशी बाजी मारली. जोकोव्हिचने तेव्हा दुसऱ्या सेटमध्ये शानदार पुनरागमन करत हा सेट ६-१ अशा फरकाने एकतर्फा जिंकला. पण तिसऱ्या सेटमध्ये आपला सर्व अनुभव पणाला लावत नदालने जोकोव्हिचला पराभूत केले. जोकोविचने या सामन्यात पाच एस देत चार चुका केल्या, तर नदालने तीन एस खेळत केवळ एक चूक केली.
हेही वाचा - भारतीय महिला संघात शफाली वर्मा ठरु शकते गेम चेंजर
हेही वाचा - इंग्लंडचे आयपीएल खेळाडू न्यूझिलंड विरुध्दच्या कसोटीपासून राहणार वंचित