ETV Bharat / sports

भारतीय वंशाच्या समीर बॅनर्जीने पटकावले ज्यूनिअर विम्बल्डनचे विजेतेपद - अ‍ॅश्ले बार्टी

भारतीय वंशाच्या अमेरिकी समीर बनर्जी याने शानदार प्रदर्शन करत ज्यूनिअर विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले.

indian-american-samir-banerjee-wins-wimbledon-boys-single-title
भारतीय वंशाच्या समीर बॅनर्जीने पटकावले ज्यूनियर विम्बल्डनचे विजेतेपद
author img

By

Published : Jul 11, 2021, 8:31 PM IST

लंडन - टेनिस विश्वात भारतीय वंशाच्या आणखी एक खेळाडूने आपला झेंडा रोवला आहे. भारतीय वंशाच्या अमेरिकी समीर बनर्जी याने शानदार प्रदर्शन करत ज्यूनिअर विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले. समीरने अंतिम सामन्यात विक्टर लिलोव याचा पराभव केला. समीरने अमेरिकेच्याच विक्टरचा ७-५, ६-३ अशा सरळ सेटमध्ये पराभव करत ज्यूनिअर विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले.

  • Remember the name - Samir Banerjee 🇺🇸

    The American wins his first junior Grand Slam singles title by beating Victor Lilov in the boys' singles final#Wimbledon pic.twitter.com/Xc3ueczg5m

    — Wimbledon (@Wimbledon) July 11, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

समीर एकतर्फा सामन्यात आपल्याच देशाच्या विक्टरवर भारी पडला. विक्टरने काही काळ समीरसमोर कडवे आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण निर्णायक क्षणात समीरने वेगाने सर्विस करत तसेच रिटर्न शॉट मारत पहिला सेट ७-५ असा जिंकला. पहिल्या सेट गमावल्याचा परिणाम विक्टरवर पडला. त्याने दुसऱ्या सेटमध्ये अनेक चूका केल्या. या फायदा उचलत समीरने हा सेट ६-३ असा जिंकत विजेतेपद पटकावले.

अ‍ॅश्ले बार्टी विम्बल्डनची नवी 'राणी'

अग्रमानांकित अ‍ॅश्ले बार्टीने विम्बल्डन २०२१ सालच्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चेक प्रजासत्ताकची कॅरोलिना प्लिस्कोव्हा हिचा पराभव करत विजेतेपद पटकावले. बार्टीने अंतिम सामन्यात कॅरोलिनाचा ६-३, ६-७ (४-७) ६-३ असा पराभव केला. विम्बल्डनला बार्टीच्या रुपाने नवा विजेता मिळाला. तर दुसरीकडे कॅरोलिना प्लिस्कोव्हाचे विम्बल्डन जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे.

अ‍ॅश्ले बार्टीने अंतिम सामन्यात कॅरोलिना प्लिस्कोव्हाचा पहिला सेटमध्ये ६-३ ने धुव्वा उडवला. त्यानंतर कॅरोलिना हिने दुसऱ्या सेटमध्ये कडवी झुंज दिली. तिने हा सेट ट्रायब्रेकरमध्ये ७-६ (७-४) असा जिंकत सामना बरोबरीत आणला. पण बार्टीने तिसऱ्या सेटमध्ये कॅरिलोनाचा कडवा प्रतिकार मोडीत काढत तिसरा सेट ६-३ असा जिंकत विजेतेपदाला गवसणी घातली.

अ‍ॅश्ले बार्टीने २०१८ मध्ये फ्रेंच ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. यानंतर तिला ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकता आलेली नव्हती. पण तिने विम्बल्डन जिंकत दुसरे ग्रँडस्लॅम मिळवले. ती इव्होनी कावली यांच्यानंतर विम्बल्डनचे विजेतेपद पटकावणारी ऑस्ट्रेलियाची दुसरी महिला टेनिसपटू बनली आहे.

हेही वाचा - IND vs SL: महेला जयवर्धने आजही 'या' विभागात 'किंग', सचिन तेंडुलकर थोडसे मागे तर विराट कोहली 'या' स्थानावर

हेही वाचा - ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदके जिंकणाऱ्या खेळाडूंची संपूर्ण यादी, एका क्लिकवर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.