जर्मनी - वीस वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन रॉजर फेडररला हाले ओपनमध्ये पराभवाचा धक्का बसला. कॅनडाच्या २० वर्षीय फेलिक्स ऑगरने फेडररचा २-६, ६-३, ६-२ असा पराभव केला. विशेष म्हणजे ऑगर लहानपणापासून फेडररला आपला आदर्श मानतो.
फेडरर विम्बल्डनच्या तयारीसाठी हाले ओपन स्पर्धेत सहभाग घेतला होता. परंतु अंतिम १६ मध्ये झालेल्या सामन्यात ऑगरने फेडररला पराभवाचा जबर धक्का दिला.
तीन वर्षापूर्वी फेडररचा असाच झाला पराभव
तीन वर्षांपूर्वी रॉजर फेडरर जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी होता. त्याचा हाले ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात क्रोएशियाच्या बोर्ना कोरिच याने पराभव केला होता. जागतिक क्रमवारीत ३४ व्या स्थानी असलेल्या कोरिच याने फेडररला ७-६ (६), ३-६, ६-२ अशा फरकाने पराभव करत विजेतेपद पटकावलं होतं. या पराभवानंतर फेडररला आपलं अव्वलस्थान देखील गमावावं लागलं होतं.
हेही वाचा - ग्रेट कमबॅक! सचिन, लक्ष्मणने केलं जोकोव्हिचचं कौतूक
हेही वाचा - मोठी बातमी, नदालची विम्बल्डन आणि टोकियो ऑलिम्पिकमधून माघार