नवी दिल्ली - ग्रीसचा उदयोन्मुख खेळाडू स्टेफानोस सितसिपासने ऑस्ट्रियाचा दिग्गज खेळाडू डोमिनिक थीमचा पराभव करून एटीपी फायनल्स स्पर्धा आपल्या नावावर केली. रविवारी रात्री उशिरा झालेल्या रोमांचकारी सामन्यात २१ वर्षाच्या सितसिपासने थीमला ६-७(६/८), ६-२, ७-६(७/४) असे हरवले.
-
Tsitsipas fights back to beat Thiem and claim ATP Finals title https://t.co/H5jM5KKk73 pic.twitter.com/g5xRaDKhFR
— Reuters (@Reuters) November 18, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Tsitsipas fights back to beat Thiem and claim ATP Finals title https://t.co/H5jM5KKk73 pic.twitter.com/g5xRaDKhFR
— Reuters (@Reuters) November 18, 2019Tsitsipas fights back to beat Thiem and claim ATP Finals title https://t.co/H5jM5KKk73 pic.twitter.com/g5xRaDKhFR
— Reuters (@Reuters) November 18, 2019
हेही वाचा - गंभीरने सांगितली 'त्या' अपूर्ण राहिलेल्या शतकाची कहाणी...धोनीला ठरवले दोषी
ऑस्ट्रेलियाच्या लेटन हेविटनंतर, ही स्पर्धा जिंकणारा सितसिपास हा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. २००१ मध्ये हेविटने वयाच्या २०व्या वर्षी ही स्पर्धा आपल्या नावावर केली होती. या स्पर्धेत त्याने स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररला सरळ सेटमध्ये मात दिली आहे.
या स्पर्धेदरम्यान सितसिपासला नदालने हरवले होते. थीमविरूद्ध झालेल्या अंतिम सामन्यात पहिला सेट गमावल्यानंतर, सितसिपासने दमदार पुनरागमन करत विजेतेपद पटकावले.