मेलबर्न - अमेरिकेची जेनिफर ब्रॅडीने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. तिने उपांत्य फेरीच्या सामन्यात झेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना मुचोवा हिचा तीन सेटमध्ये पराभव केला.
ब्रॅडी-मुचोवा यांच्यातील सामना रंगतदार झाला. एक तास ५५ मिनिटे रंगलेल्या सामन्यात ब्रॅडीने ६-४, ३-६, ६-४ अशा फरकाने विजय मिळवला. पहिला सेट ब्रॅडीने ६-४ अशा फरकाने जिंकला. तेव्हा मुचोवा हिने दुसऱ्या सेटमध्ये कमबॅक केले. तिने दुसरा सेट ६-३ ने जिंकत सामना बरोबरीत आणला. पण निर्णायक सेटमध्ये जागतिक क्रमवारीत २२ व्या स्थानावर असलेल्या ब्रॅडीने ६-४ अशी बाजी मारत अंतिम फेरीत धडक दिली.
-
What a battle 💪👏@jennifurbrady95 is moving on to the final! 🇺🇸
— #AusOpen (@AustralianOpen) February 18, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Next up: Naomi Osaka 🏆#AusOpen | #AO2021 pic.twitter.com/i1iATqYwMb
">What a battle 💪👏@jennifurbrady95 is moving on to the final! 🇺🇸
— #AusOpen (@AustralianOpen) February 18, 2021
Next up: Naomi Osaka 🏆#AusOpen | #AO2021 pic.twitter.com/i1iATqYwMbWhat a battle 💪👏@jennifurbrady95 is moving on to the final! 🇺🇸
— #AusOpen (@AustralianOpen) February 18, 2021
Next up: Naomi Osaka 🏆#AusOpen | #AO2021 pic.twitter.com/i1iATqYwMb
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात जपानची नाओमी ओसाका हिने २३ ग्रँडस्लॅम विजेती सेरेना विल्यम्स हिचा ६-३, ६-४ ने पराभव करत अंतिम फेरी गाठली. ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला एकेरीचा अंतिम सामना नाओमी ओसाका आणि जेनिफर ब्रॅडी यांच्यात होणार आहे.
हेही वाचा - Australian Open: नदालला पराभवाचा धक्का; पाच सेटच्या थरारक सामन्यात सित्सिपासची बाजी
हेही वाचा - Australian Open : रूबलेवचा पराभव करत मेदवेदेवने प्रथमच गाठली उपांत्य फेरी