सिडनी - ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टेनिसचा 'अनभिषीक्त सम्राट' म्हणून ओळख असलेला स्वित्झर्लंडचा अनुभवी खेळाडू रॉजर फेडररला धक्का बसला. फेडररला दुसऱ्या मानांकित सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने सरळ सेटमध्ये मात दिली. जोकोव्हिचने या विजयासह अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे.
उपांत्य फेरीत जोकोव्हिचने फेडररला ७-६ (७-१), ६-४, ६-३ अशी सरळ सेटमध्ये मात दिली. फेडरर आणि जोकोव्हिच यांच्यातील पहिला सेट चांगलाच रंगला. पहिल्या सेटमध्ये दोघांचे समान ६-६ असे गुण झाले होते. तेव्हा सामना टायब्रेकरमध्ये गेला आणि जोकोव्हिचने यात ७-१ अशी बाजी मारली.
-
One set away.
— #AusOpen (@AustralianOpen) January 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
On his first opportunity, @DjokerNole breaks the Federer serve to clinch the second set 6-4. #AO2020 | #AusOpen pic.twitter.com/eKCfGy2uoo
">One set away.
— #AusOpen (@AustralianOpen) January 30, 2020
On his first opportunity, @DjokerNole breaks the Federer serve to clinch the second set 6-4. #AO2020 | #AusOpen pic.twitter.com/eKCfGy2uooOne set away.
— #AusOpen (@AustralianOpen) January 30, 2020
On his first opportunity, @DjokerNole breaks the Federer serve to clinch the second set 6-4. #AO2020 | #AusOpen pic.twitter.com/eKCfGy2uoo
पहिला सेट जिंकल्यानंतर जोकोव्हिचचा आत्मविश्वास वाढला आणि त्याने दुसरा सेट ६-४ असा जिंकला. फेडररने टेनिस सँडग्रेनविरुध्दच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात २ सेट गमावूनही उलटफेर केला होता. यामुळे या सामन्यातही तो उलटफेर करेल, अशी आशा होती. पण ती फोल ठरली. जोकोव्हिचच्या झंझावतीसमोर फेडरर निष्प्रभ ठरला. तिसऱ्या सेटमध्येही जोकोव्हिचने ६-३ अशी बाजी मारली आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.
-
Eyeing off 8️⃣ Australian Open finals and the right to claim sole ownership of the all-time record for most #AusOpen finals 👀@DjokerNole | #AO2020 pic.twitter.com/4rFF8wSYXi
— #AusOpen (@AustralianOpen) January 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Eyeing off 8️⃣ Australian Open finals and the right to claim sole ownership of the all-time record for most #AusOpen finals 👀@DjokerNole | #AO2020 pic.twitter.com/4rFF8wSYXi
— #AusOpen (@AustralianOpen) January 30, 2020Eyeing off 8️⃣ Australian Open finals and the right to claim sole ownership of the all-time record for most #AusOpen finals 👀@DjokerNole | #AO2020 pic.twitter.com/4rFF8wSYXi
— #AusOpen (@AustralianOpen) January 30, 2020
हेही वाचा - Australian Open : महिला एकेरीत मिळणार नवा विजेता, हालेपचे आव्हान संपुष्टात
हेही वाचा - Australian Open : टॉप-१ अॅश्ले बार्टीचे स्वप्न भंगले, सोफियाने चारली धूळ