ETV Bharat / sports

यंदाच्या यूएस ओपनमधून बार्टीची माघार

author img

By

Published : Jul 31, 2020, 1:03 PM IST

31 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर या कालावधीत यूएस ओपन स्पर्धा होणार आहे. ''मी आणि माझ्या संघाने निर्णय घेतला आहे की आम्ही यावर्षी वेस्टर्न आणि सदर्न ओपन आणि अमेरिकन ओपनसाठी प्रवास करू शकणार नाही. मला या दोन्ही स्पर्धा आवडतात. त्यामुळे हा एक कठीण निर्णय होता. पण कोरोनामुळे मी माझ्या संघासाठी जोखीम घेण्यास तयार नाही'', असे बार्टीने गुरुवारी ईमेलवर म्हटले आहे.

Ashleigh barty withdraws from us open due to covid-19
यंदाच्या यूएस ओपनमधून बार्टीची माघार

ब्रिस्बेन - ऑस्ट्रेलियाची आघाडीची महिला टेनिसपटू एश्ले बार्टी हिने कोरोनाच्या धोक्यामुळे यूएस ओपनमधून माघार घेतली आहे. या ग्रँडस्लॅम स्पर्धेतून माघार घेतलेली आतापर्यंतची ती सर्वाधिक 'हाय प्रोफाइल' खेळाडू आहे.

31 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर या कालावधीत यूएस ओपन स्पर्धा होणार आहे. ''मी आणि माझ्या संघाने निर्णय घेतला आहे की आम्ही यावर्षी वेस्टर्न आणि सदर्न ओपन आणि अमेरिकन ओपनसाठी प्रवास करू शकणार नाही. मला या दोन्ही स्पर्धा आवडतात त्यामुळे हा एक कठीण निर्णय होता. पण कोरोनामुळे मी माझ्या संघासाठी जोखीम घेण्यास तयार नाही'', असे बार्टीने गुरुवारी ईमेलवर म्हटले आहे.

कोरोनाव्हायरसमुळे मार्चपासून कोणतीही व्यावसायिक टेनिस स्पर्धा खेळली गेलेली गेली नाही. सहसा यूएस ओपन ही वर्षाची शेवटची ग्रँडस्लॅम स्पर्धा असते. पण आता ती फ्रेंच ओपनच्या आधी होणार आहे. वर्षाची दुसरा ग्रँडस्लॅम स्पर्धा फ्रेंच ओपन कोरोनामुळे पुढे ढकलली गेली आहे. यापूर्वी ती 24 जून ते 7 जुलै दरम्यान खेळली जाणार होती. पण ती आता 27 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान खेळली जाईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.