ETV Bharat / sports

महिला टेनिस : ऑस्ट्रेलियाची अ‍ॅश्ले बर्टी जागतिक क्रमावारीत ठरणार अव्वल

author img

By

Published : Jun 23, 2019, 10:50 PM IST

ऑस्ट्रेलियाची महिला खेळाडू अ‍ॅश्ले बर्टीने नेचर वॅली क्लासिक स्पर्धा जिंकली आहे. तिने जर्मनीच्या जूलिया जॉर्जेस हिचा ६-३, ७-५ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. यापूर्वी बर्टी हिने फ्रेंच ओपनची स्पर्धा जिंकली आहे. या स्पर्धेच्या विजयामुळे बर्टी जागतिक महिला क्रमवारीत प्रथम क्रमांक पटकवणार आहे.

महिला टेनिस : ऑस्ट्रेलियाची अ‍ॅश्ले बर्टी जागतिक क्रमावारीत अव्वल ठरणार

बर्मिघम - ऑस्ट्रेलियाची महिला खेळाडू अ‍ॅश्ले बर्टीने नेचर वॅली क्लासिक स्पर्धा जिंकली आहे. तिने जर्मनीच्या जूलिया जॉर्जेस हिचा ६-३, ७-५ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. यापूर्वी बर्टी हिने फ्रेंच ओपनची स्पर्धा जिंकली आहे. या स्पर्धेच्या विजयामुळे बर्टी जागतिक महिला क्रमवारीत प्रथम क्रमांक पटकवणार आहे.

सोमवारी डब्ल्यूटीएची क्रमवारी जाहीर होणार आहे. यात अ‍ॅश्ले बर्टी जपानच्या नाओमी ओसाका हिला पाठिमागे टाकत प्रथम क्रमांकावर विराजमान होईल. बर्टी ही इवोने गोलागोंग नंतर जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांक मिळवणारी ऑस्ट्रेलियाची दुसरी खेळाडू ठरणार आहे. गोलागोंगने १९७६ साली जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांक पटकावले होते.

नेचर वॅली क्लासिक स्पर्धा जिंकल्यानंतर बर्टीने सांगितले की, मला खूप आनंद झाला आहे. या आठवड्यात आणि या वर्षी माझ्या कारकीर्दमध्ये चढ-उतार होत आहेत. माझी आदर्श असलेल्या इवोने हिच्यासोबत माझे नाव घेण्यात येणे ही माझ्यासाठी खूप आनंददायी बाब आहे. असं तिने सांगितलं. बर्टीने या स्पर्धेत अमेरिकेच्या व्हीनस विल्यम्ससारख्या दिग्गज खेळाडूचा पराभव केला आहे.

Intro:Body:

Dummy

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.