मेलबर्न - भारताची आघाडीची महिला टेनिसपटू अंकिता रैनाने एकेरी गटात ऑस्ट्रेलियन ओपन पात्रता स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक क्रमवारीत ११८व्या क्रमांकावर असलेल्या कतरिन जावत्स्कावर अंकिताने विजय नोंदवला. परंतु पुरुष एकेरीत रामकुमार रामनाथनला पराभव पत्करावा लागला आहे.
दुबईमध्ये सुरू असलेल्या महिला एकेरीच्या पात्रता गटात अंकिताने दुसर्या फेरीत युक्रेनियन खेळाडूला ६-२, २-६, ६-३ असे पराभूत केले. अंकिता सहाव्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे.
आतापर्यंत केवळ निरुपमा वैद्यनाथन आणि सानिया मिर्झा यांनी कोणत्याही ग्रँडस्लॅम स्पर्धेतील महिला एकेरीच्या मुख्य ड्रॉमध्ये भारतासाठी प्रवेश नोंदवला आहे. निरुपमाने १९९८ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुसर्या फेरीत प्रवेश केला होता. तर सायनाने २०१२ पासून एकेरीत भाग घेणे बंद केले होते.
दोहा येथे सुरू असलेल्या पुरुष एकेरीत रामकुमारला दुसर्या फेरीत चिनी तैपेईच्या तुंग लिन वू विरुद्ध ३-६, २-६ असा पराभवाचा सामना करावा लागला.
हेही वाचा - चौथ्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या गोटात चिंतेचे वातावरण