लंडन - ब्रिटनचा तीन वेळा ग्रँडस्लॅम विजेता टेनिसपटू अँडी मरे ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये जाण्यापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. एका अहवालानुसार ८ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या वर्षाच्या पहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेसाठी मरेला वाइल्ड कार्ड प्रवेश देण्यात आला आहे. परंतु कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्याला या स्पर्धेत भाग घेणे कठीण जाणार आहे.
हेही वाचा - 'स्टार' क्रिकेटपटूमध्ये कोरोनाचा नवीन स्ट्रेन!
३३ वर्षीय मरे एका दिवसानंतर मेलबर्नला रवाना होणार होता. परंतु त्याने आता घरीच राहण्याचा निर्णय घेतला आहे. काही वृत्तानंतर, तो ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळण्याची अपेक्षा आहे. मरेने यापूर्वी डेल रे बीच बीच टेनिस स्पर्धेतून माघार घेतली होती. दुखापतीमुळे नव्हे, तर कोरोनामुळे स्पर्धेतून माघार घेत असल्याचे मरेने यावेळी म्हटले होते.
ऑस्ट्रेलियन ओपनसाठी देशात दाखल झाल्यानंतर खेळाडूंना १४ दिवस क्वारंटाइन असणे आवश्यक आहे. पाचवेळा उपविजेता असलेल्या मरेचा ऑस्ट्रेलियन ओपन २०१९ च्या पहिल्या फेरीतील सामन्यात स्पेनच्या रॉबर्टो बटिस्टा अॅगूटकडून पराभव झाला होता.