मेलबर्न - गतविजेती नाओमी ओसाकाने ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेची तिसरी फेरी गाठली. तिने दुसऱ्या फेरीत चीनच्या साईसाई झेंगचा ६-२, ६-४ अशी धूळ चारली. तर दुसरीकडे अश्ले बार्टीने ही तिसरी फेरी गाठली.
![2020 Australian Open Day 3: Naomi Osaka throws and kicks racquet, comes back to win](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/5795227_thukljm.jpg)
नाओमीने १ तास २० मिनिटे रंगलेल्या सामन्यात, पहिला सेट ६-२ ने जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये ती २-१ ने पिछाडीवर पडली. त्यात तिच्या एका चूकीमुळे झेंगला सोपा अॅडव्हानटेज पाँईंट मिळाला. तेव्हा नाओमीचा पारा चढला आणि तिने आपला राग कोर्टवर रॅकेट आदळून व्यक्त केला.
दरम्यान, नाओमी हा सामना आरामात जिंकून इच्छित होती. पण, ती दुसऱ्या सेटमध्ये पिछाडीवर गेली. तेव्हा ती स्वत:वर नाराज दिसून आली. तिने पुढील काही क्षणातच आपल्या खेळात सुधारणा केली आणि दुसरा सेटसह (६-४) सामना आपल्या नावे केला.
अॅश्ले बार्टीची घौडदौड सुरू -
अॅश्ले बार्टाने स्लोवेनियाच्या पोलोना हरकोग हिचा ६-१, ६-४ ने पराभव करत तिसरी फेरी गाठली. बार्टीने हा सामना १ तास ६ मिनिटात जिंकला.
हेही वाचा - Australian Open : टेनिस 'सुंदरी' मारिया शारापोव्हा पहिल्या फेरीत गारद
हेही वाचा - आई बनल्यानंतर सानियाची दमदार वापसी, जिंकली होबार्ट इंटरनॅशनल स्पर्धा